कौतुकास्पद! अवघ्या ७ वर्षीय व्योमने केले भगवत गीतेचे सर्व अध्याय तोंडपाठ; मिळवला प्रथम क्रमांक

ज्या वयात मुलं बोबडे बोल बोलत असतात त्या वयात एका चिमुकल्याने संपुर्ण गीता तोंडपाठ केली आहे.
Dombivli  News
Dombivli Newsप्रदीप भणगे

डोंबिवली: ज्या वयात मुलं बोबडे बोल बोलत असतात त्या वयात एका चिमुकल्याने संपुर्ण गीता तोंडपाठ केली आहे. वय अवघे सात वर्ष , या वयातील मुलांचे मातृभाषेतील मराठी उच्चार देखील बोबडे असतात. मात्र, डोंबिवलीमधील (Dombivli) सात वर्षीय व्योम दाभाडकर याने भगवद्गीतेचे सगळे १८ अध्याय त्यामधील ७०० श्लोक शास्त्रशुद्ध उच्चारणासह पूर्ण पाठ केले आहेत.

गीतेमधील १८ अध्यायातील कोणत्याही श्लोकाची सुरुवात सांगितली की तो पुढील संपूर्ण श्लोक सांगू शकतो. गीतेमधील (Bhagavad Gita) कोणताही श्लोक विचारला तरी व्योम न चुकता सांगतो. व्योमने नुकतेच कर्नाटक (Karnataka) शृंगेरी येथे शारदा पिठातील शंकरचार्यांमसमोर भगवद्गीता पाठांतर परीक्षेत प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळवलं आहे. शंकराचार्यांच्या हस्ते त्याचा २१ हजार रुपये व प्रमाणपत्र देऊन त्याचा विशेष गौरव करण्यात आला आहे.

पाहा व्हिडीओ -

डोंबिवली पूर्व खंबालपाडा येथील अबोली स्टेट सोसायटीत राहणारा व्योम दाभाडकर हा त्याची आई श्रद्धा , बाबा ओंकार,आजी उज्वला आणि आजोबा पद्माकर यांच्या सोबत राहत आहे. सिस्टर निवेदिता इंग्लिश स्कूलच्या इयत्ता दुसरी मध्ये तो सध्या शिकत असून व्योमच्या आजीने उज्वला दाभाडकर यांनी त्याला गीता शिकवली आहे.

कल्याण येथील श्री गुरु कलम न्यास यांच्यामार्फत त्यांच्या आजी उज्वला दाभाडकरांनी देखील २०१९ साली कर्नाटक शृंगेरी येथे शारदा पिठातील शंकरचार्यांमसमोर भगवद्गीता पाठांतर परीक्षेत प्रथम क्रमांकाचं पारितोषिक जिंकलं होतं. उज्वला दाभाडकर यांनी श्री गुरुकुलम् न्यासकडून गीता संथा घेतली आहे.आपली आजी श्लोक म्हणत असताना व्योम ते ऐकायचा.

Dombivli  News
VIDEO : बैलासोबत पंगा घेणं पडलं महागात; तरुणाची झाली भलतीच फजिती

त्यामुळे त्याचे कुतूहल वाढत गेलं आणि त्याने आजीकडे श्लोक शिकण्यासाठी हट्ट धरला. दरम्यान आजी श्लोक म्हणतानाचं ऐकून ऐकून वयाच्या चौथ्या वर्षी त्याला उच्चारासह श्लोक पाठ झाले. व्योमची स्मरणशक्ती बघता आजी उज्वला यांनी देखील व्योमला श्लोक शिकवण्याचा निश्चय केला. आपल्या आजीच्या पावलावर पाऊल ठेवून व्योमने देखील गीता पठनातला एक वर्षापूर्वी सुरुवात केली.

त्यानंतर त्याने अवघ्या वर्षभरामध्ये गीतेचे संपूर्ण १८ अध्याय तोंडपाठ केले. या अध्ययांमध्ये एकूण ७०० श्लोक आहेत .अवघ्या ७ वर्षाच्या व्योमने भगवद्गीतेचे सर्व अध्याय शास्त्रशुद्ध उच्चारणासह पूर्ण पाठ केले आहेत. एवढंच नव्हे तर कोणताही श्लोक त्याला अधूनमधून जरी विचारला तर तो सांगू शकतो.

Dombivli  News
Ranveer Singh : न्यूड फोटोशूट प्रकरण; रणवीर सिंगचा पोलीस चौकशीत मोठा खुलासा!

मागील आठवड्यातच कर्नाटकमधील शृंगेरीला ब्रह्मवृंद गुरु यांच्या समक्ष व शंकराचार्यांच्या उपस्थितीत व्योमने सतराव्या अध्याय एकही चूक न करता संपूर्ण बोलून दाखवला. इतक्या लहान मुलाचे संपूर्ण अध्याय पाठ असल्याने त्याच्या या कामगिरीचे तेथील श्री श्री जगद्गुरु शंकराचार्य महासंस्था यांनी कौतुक करून त्याला प्रशस्तीपत्र देत गौरव केला आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com