निर्माल्यात आता कचरा टाकाल तर पडेल महागात....

डोंबिवली मधील प्रसिद्ध आणि जुने श्री गणेश मंदिर संस्थानच्या वतीने एमआयडीसी मध्ये निर्माल्य खत प्रकल्प राबविला जातो आहे.
निर्माल्यात आता कचरा टाकाल तर पडेल महागात....
निर्माल्यात आता कचरा टाकाल तर पडेल महागात...प्रदीप भणगे

डोंबिवली : डोंबिवली Dombivli मधील प्रसिद्ध आणि जुने श्री गणेश मंदिर Shri Ganesh Temple संस्थानच्या वतीने एमआयडीसी MIDC मध्ये निर्माल्य खत प्रकल्प राबविला जातो आहे. त्याकरिता गणेश मंदिर आवारात निर्माल्य गोळा केले जाते. या खत प्रकल्पात दररोज सुमारे ८०० किलोच्या आसपास निर्माल्यावर प्रक्रिया केली जाते. वर्षभराच्या कालावधीत सुमारे ६० टन निर्माल्य खत या प्रकल्पात तयार केले जाते.

मात्र, गेल्या महिन्यापासून या निर्माल्यात प्लास्टिक Plastic, जुने कपडे, कुजलेला कचरा नागरिकांकडून टाकला जात आहे. सूचना देऊनही नागरिक ऐकत नसल्याने, अखेर संस्थानने बॅनर लावत केडीएमसीची KDMC मदत घेत प्लास्टिक टाकणाऱ्या नागरिकांना दंड ठोठावण्यास सुरवात केली आहे. आतापर्यंत सुमारे १० जणांना दंड ठोठावला आहे. प्रत्येकी ३०० रुपये वसूल केले जात आहेत.

हे देखील पहा-

त्यामुळे निर्माल्यात आता कचरा टाकाल तर महागात पडणार आहे. याबाबत गणेश मंदिरचे विश्वस्थ राहुल दामले यांनी सांगितले की, मागील अनेक वर्षांपासून मंदिराचा निर्माल्य खत प्रकल्पाचा उपक्रम सुरू आहे. पण तो आता आमच्या हाताबाहेर जायला लागला आहे. अनेक वेळा लोकांना सूचना करून, पण लोक प्लॅस्टिकच्या पिशव्यांमधूनच निर्माल्य टाकतात. इतकच नाही तर, निर्माल्य बरोबर अतिरिक्त कचरा सुद्धा आता मंदिरात यायला लागला आहे.

निर्माल्यात आता कचरा टाकाल तर पडेल महागात...
इस्लामपूर शहरात सुरू झाले 'ई-कचरा' मुक्त अभियान

यामुळे आता ही परिस्थिती आमच्या हाताबाहेर जात आहे. म्हणून आम्ही कल्याण Kalyan डोंबिवली महापालिकेची Municipal Corporation सुद्धा यासाठी मदत घेतली आहे. जर नागरिकांनी आम्हला सहकार्य केले नाही. तर महापालिकेच्या मदतीने दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. निर्माल्य गोळा करणारे, सेवक कामगार पांडुरंग साळुंखे यांनी सांगितले की, हे निर्माल्य गोळा आणि बाजूला करताना नागरिक कुजलेला कचरा, घरचे साहित्य टाकत आहेत. त्याच्यामुळे आम्हला त्रास होत आहे.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com