Dombivali: एकोणीस गुन्ह्यांमध्ये आरोपी असणाऱ्या तीन सराईत गुन्हेगारांना अटक

Dombivali Crime News : राम नगर पोलीस ठाण्याचे पोलिस चोलेगाव ते ठाकुर्ली येथे पेट्रोलिंग करत असताना ऍक्टिवा स्कूटीवर तीन अनोळखी इसम संशयीतरीत्या दिसले.
Dombivali: एकोणीस गुन्ह्यांमध्ये आरोपी असणाऱ्या तीन सराईत गुन्हेगारांना अटक
Dombivli police have arrested three criminals accused in 19 casesप्रदीप भणगे

डोंबिवली : घरफोडी, चेन स्नॅचिंग गाड्या चोरी करणे असे १९ गुन्हे नावावर असणाऱ्या तीन जणांना राम नगर पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान या चोरांकडून ८८ हजार ७५० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत (Acquired) करण्यात आला आहे. त्रिमूर्ती नगर येथे राहणारे राहुल उर्फ बुद्धी बबलू सिंग जुनी सरदार (१९), गुरुदेव सिंग उर्फ काळी नरेश भगानिया (१९), शिवार ऋषिपाल तुसांबड (१९) अशी अटक (Arrested) करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. (Dombivli police have arrested three criminals accused in 19 cases)

हे देखील पाहा -

गुड फ्रायडे निमित्त मद्रासी मंदिरातून दर्शन घेऊन गीतांजली सोसायटी डोंबिवली (Dombivali) पूर्व येथून पायी चालत जात असताना तीन अनोळखी इसमांनी फिर्यादी आनंद कुमारी के ( ६७ ) यांच्या गळ्यातील १५ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन असा एकूण पंचवीस हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जबरदस्तीने खेचून चोरून घेऊन गेले. त्यानंतर त्यांनी राम नगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंद केली. त्यानंतर राम नगर पोलीस ठाण्याचे पोलिस चोलेगाव ते ठाकुर्ली येथे पेट्रोलिंग करत असताना ऍक्टिवा स्कूटीवर तीन अनोळखी इसम संशयीतरीत्या आढळून आले. त्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर विचारपूस केली असता डोंबिवली येथील राम नगर पोलीस ठाणे, चितळसर मानपाडा अशा विविध ठिकाणी १९ गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे.

Dombivli police have arrested three criminals accused in 19 cases
Palghar : झोळीतून बाळाचं अपहरण; आठ तासांनंतर खुलासा

त्यांच्याकडून पंचवीस हजार किमतीची १५ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन, वीस हजार रुपये किंमतीची ॲक्टिवा स्कुटी, २७ हजार रुपये किंमतीचे १५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणी मंगळसूत्र, १६ हजार ७५० रुपये किंमतीचे तीन ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणी, मंगळसूत्र आणि रोख रक्कम असा एकूण १८ हजार ७५० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. पोलीस उपायुक्त परिमंडळ तीनचे पोलिस आयुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त जेडी मोरे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन यांच्या मार्गदर्शनाखाली रामनगर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी या गुन्ह्याची उकल केली असून पुढील तपास राम नगर पोलीस ठाणे करत आहे.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.