धावत्या ट्रेनमध्ये मोबाईल हिसकावणाऱ्या चोरट्याला डोंबिवली RPFने पकडले

मोबाईल घेऊन रेल्वे फलाटावरून पळ काढणाऱ्या सराईत चोरट्याला डोंबिवली आरपीएफ पोलिसांनी पाठलाग करून रंगेहात पकडले आहे.
धावत्या ट्रेनमध्ये मोबाईल हिसकावणाऱ्या चोरट्याला डोंबिवली RPFने पकडले
धावत्या ट्रेनमध्ये मोबाईल हिसकावणाऱ्या चोरट्याला डोंबिवली RPFने पकडलेप्रदीप भणगे

डोंबिवली : रेल्वे गाडी सुरु झाल्यावर स्टेशन संपण्याच्या आधी प्रवाशांच्या हाताला झटका देत मोबाईल घेऊन रेल्वे फलाटावरून पळ काढणाऱ्या सराईत चोरट्याला डोंबिवली आरपीएफ पोलिसांनी पाठलाग करून रंगेहात पकडले आहे. मोहम्मद सुखरुद्दिन जाकीर शेख असे या सराईत मोबाईल चोरट्याचे नाव असून तो मुळचा झारखंड येथील राहणारा आहे.

हे देखील पहा :

शनिवारी दुपारी २ वाजून २४ मिनिटांनी कोपर स्टेशनवर कसारा लोकल थांबली असता हा आरोपी ट्रेनमध्ये चदला. ट्रेन सुरू होताच 57 वर्षीय शिवाजी विष्णू बोगार्डे नावाच्या प्रवाशाच्या हाताला झटका देत मोबाईल खेचून त्याने पळ काढला. बोगार्डे यांनी आरडा-ओरड केल्यावर रेल्वे स्थानकात कर्तव्यावर असलेल्या रेल्वे सुरक्षा बलाच्या महिला कॉन्स्टेबल प्रतिभा शर्मा, एमएसएफ कर्मचारी अक्षय ईश्वर येळकर आणि जीआरपी कर्मचारी पीसी यादव यांनी पाठलाग करत या चोरट्याला रेल्वे स्टेशन बाहेर एक किलोमीटर पर्यंत पाठलाग करून पकडले.

वाह! खात्यात आलेले 14 लाख केले परत; ट्रकचालकाचा प्रामाणिकपणा, पहा Video
धावत्या ट्रेनमध्ये मोबाईल हिसकावणाऱ्या चोरट्याला डोंबिवली RPFने पकडले
धक्कादायक! अकोल्यात मोरणा नदीची भिंत गेली चोरीला; गुन्हा दाखल!

अटक आरोपीला डोंबिवली लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. मात्र, गेल्या अनेक दिवसापासून स्टेशनवर ट्रेनची गती वाढताच प्रवाशांच्या हातातले मोबाईल घेऊन पसार होणाऱ्या या सराईत चोराचा शोध कल्याण, डोंबिवली, ठाणे सह इतर रेल्वे सुरक्षा बल व इतर पोलिस घेत आहेत. या चोराला आरपीएफ पोलिसांनी पकडल्याने या कामगिरीबद्दल त्याचे कौतुक करत त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com