राज्यात पुन्हा सगळं बंद करण्यास भाग पाडू नका: अजित पवार...(व्हिडीओ)

नियम पाळा अन्यथा पुन्हा निर्बंध लावण्यात येतील असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. ते पुण्यात बोलत होते.
राज्यात पुन्हा सगळं बंद करण्यास भाग पाडू नका: अजित पवार...(व्हिडीओ)
राज्यात पुन्हा सगळं बंद करण्यास भाग पाडू नका: अजित पवार...(व्हिडीओ)Saam Tv

पुणे : नियम पाळा अन्यथा पुन्हा निर्बंध लावण्यात येतील असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar यांनी दिला आहे. ते पुण्यात Pune बोलत होते. कोरोनाच्या Corona पार्श्ववभूमीवर नागरिक नियमच पालन करत नाहीत त्यामुळे रुग्ण संख्या पुन्हा वाढत असल्याचं त्यांनी सांगितलं.

तर शाळांबाबत टास्क फोर्स Task Force शी चर्चा करून लवकरच निर्णय घेतला जाईल असं त्यांनी सांगितलं. तसेच बारामतीमध्ये Baramati एका प्रकरणात छापेमारी झाली त्याच्याशी आपला काहीही संबंध नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

व्हिडीओ-

पुण्यात बोलत असताना अजित पवार म्हणाले, मुख्यमंत्री वेळोवेळी सर्वांना आवाहन करतात. परंतु त्यातूनही काही जण राजकारण करतात. त्यातून सण साजरे करतात. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. पण पुन्हा तिसरी लाट आल्यानंतर अन्यथा ये रे माझ्या करून सगळंच बंद करण्याची वेळ कृपया शासनावर जनतेने आणू नये. असा कडक इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे.

शाळा सुरु करण्याबाबत तज्ज्ञांशी बोलून निर्णय;

शाळा सुरु करण्याबाबत मी आमच्या मंत्री महोदयांचे स्टेटमेंट ऐकले आहे. प्रत्येकाला आपापल्या डिपार्टमेंट ची माहिती घेऊन अभ्यास करून, प्रस्ताव ठेवण्याचा अधिकार आहे. परंतु शेवटी टास्क फोर्स शी चर्चा करून लवकरच निर्णय मुख्यमंत्री घेतील. आणि शाळा नक्की कशी सुरु करायचा याबद्दलचा निर्णय ते घेतील असं त्यांनी स्पष्ट केलं.

राज्यात पुन्हा सगळं बंद करण्यास भाग पाडू नका: अजित पवार...(व्हिडीओ)
Siddharth Shukla: आज सकाळी मुंबईत होणार अंत्यसंस्कार

'ते' आरोप खोटे
माझा दुरानवय संबंध नसताना माझ्यावर हायकोर्टात बारामतीच्या कुठल्यातरी जमिनीच्या बद्दल केस दाखल असं. या धादांद खोटा आरोप आहे. कशासाठी तुम्ही हे धंदे करता? वास्तविक तुम्ही कन्फर्म करा. कुठे धाडी पडल्या ? बातम्या आहेत. मीडियानं विश्वासार्ह बातम्या द्याव्यात, लोकांचा आणि आमचा विश्वास आता उडत चालला आहे, असं अजित पवार म्हणाले.

Edited By-Sanika Gade

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com