बुलंद आवाज हरपला; ज्येष्ठ वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांचं निधन

प्रदीर्घ आजाराने त्यांचे मुंबईत निधन झाल्याची माहिती डीडी सह्याद्रीने ट्विटरवरुन दिली.
Pradeep Bhide
Pradeep BhideSaam Tv

मुंबई: सुप्रसिध्द वृत्तनिवेदक प्रदीप भिडे (Pradeep Bhide) यांचे आज निधन झाले. वयाच्या ६५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दूरदर्शनमध्ये त्यांनी ४२ वर्ष त्यांनी वृत्तनिवेदन केले आहे. प्रदीर्घ आजाराने त्यांचे मुंबईत (Mumbai) निधन झाल्याची माहिती डीडी सह्याद्रीने ट्विटरवरुन दिली. बातम्या सांगण्याची खास शैली आणि भारदस्त आवाज यामुळे ते दूरदर्शनवरील बातम्यांची ओळख बनले होते.

Pradeep Bhide
हैदराबादच्या आमदारावर नांदेडमध्ये गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण?

प्रदीप भिडे यांचे महाविद्यालयीन शिक्षण पुण्यात झाले. पदवीनंतर त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमध्ये पत्रकारितेचे शिक्षण घेतले. त्यांनी बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये 'जनसंपर्क अधिकारी' पदावर काम केले. पुढं १९७४ मध्ये त्यांनी मुंबई दूरदर्शन केंद्रामध्ये नोकरीला सुरुवात केली.

Pradeep Bhide
monkeypox virus : मंकीपॉक्सच्या 'त्या' संशयित रुग्णाचा रिपोर्ट अखेर आला

प्रदीप भिडे (Pradeep Bhide) यांना नाटकाचीही पार्श्वभूमी होती. त्यांनी ध्वनिमुद्रण क्षेत्रात स्वत:चे स्थान निर्माण केले होते. अनेक लघुपट, माहिती पट, जाहिरातींना त्यांनी आवाज दिला आहे. त्यांनी दीड ते दोन हजार कार्यक्रमांच सूत्रसंचालन केले आहे. त्यांना पुणे फेस्टीव्हलचा उत्कृष्ट निवेदक हा पुरस्कारही मिळाला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com