Fake Sim Cards: बनावट कागदपत्रे वापरुन खरेदी केली तब्ब्ल 30000 सिम कार्डस, दूरसंचार विभागाने केली बंद

बनावट कागदपत्रे वापरुन खरेदी केली तब्ब्ल 30000 सिम कार्डस, दूरसंचार विभागाने केली बंद
Fake Sim Cards
Fake Sim CardsSaam Tv

Fake Sim Cards: टीएसपीने जारी केलेले मुंबईतील 30,000 पेक्षा जास्त सत्यता प्रमाणित नसलेले मोबाइल कनेक्शन्स दूरसंचार विभागाने शोधून काढले आहेत. दूरसंचार मुंबई विभागाच्या एलएसएने या सर्व मोबाइल जोडण्या तपासल्या असून त्यासाठी त्यांनी ग्राहकांच्या डेटा बेसचा आधार घेतला आहे.

ज्यातून त्यांना 62 समूह असे आढळले आहेत, जिथे एकाच फोटोचा वापर करून, वेगवेगळ्या नावाने मोबाईल कनेक्शन घेण्यात आले आहेत. एका समूहात, असे 50 ग्राहक असण्याची मर्यादा आहे. असे असूनही या 62 समूहांमध्ये एकूण 8,247 ग्राहक आढळले. याचाच अर्थ यात पॉइंट ऑफ सेल, म्हणजेच जिथून यांची विक्री केली जाते. असे सिम विक्रेते, यांचाही बनावट सिम कार्ड देण्याच्या कारस्थानात सहभाग असल्याचे स्पष्ट होते.

Fake Sim Cards
Arpita Khan's Diamond Stolen: सलमान खानच्या बहिणीच्या घरात चोरी, हिऱ्याचे दागिने चोरांनी केले लंपास

एका प्रकरणात तर एकाच चेहऱ्याच्या व्यक्तीला 684 वेगवेगळे मोबाइल क्रमांक जारी करण्यात आले आहेत. केंद्रीय दळणवळण, रेल्वे आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज संचार साथी पोर्टलचे उद्‌घाटन केले.  (Latest Marathi News)

या सोहळ्यात आभासी पद्धतीने सहभागी झाल्यानंतर पत्रकारांना संचार साथी या पोर्टल बद्दल तसेच एएसटीआर अस्त्र या चेहेऱ्याची ओळख पटवणाऱ्या तसेच माहितीचे विश्लेषण करणाऱ्या विविध तंत्राचा वापर असलेल्या प्रणालीची माहिती मुंबईतील दूरसंचार विभागाचे अतिरिक्त महासंचालक, एच. एस. जाखड यांनी ही माहिती दिली.

दूरसंचार विभागाने बनावट सिम कार्डचे हे रॅकेट शोधून काढण्यासाठी एक अभिनव, स्वदेशी, अत्याधुनिक प्लॅटफॉर्म (सुपर कॉम्प्युटरचा वापर करून) ASTR – अस्त्र यात कृत्रिम बुद्धिमत्ता AI आणि फेशियल रिकग्निशन पॉवर्ड सोल्यूशन म्हणजेच चेहरा ओळखण्याच्या तंत्रज्ञानाचा वापर केला आहे.

सायबर गुन्ह्यांच्या धोक्याला आळा घालण्यासाठी बनावट/खोट्या मोबाइल कनेक्शनचा तपास करणे, ते ओळखणे आणि ते नष्ट करणे या दृष्टीकोनातून दूरसंचार विभागाद्वारे या तंत्रज्ञानाची रचना आणि अंमलबजावणी करण्यात आली आहे, असे, दूरसंचार विभागाच्या अतिरिक्त महासंचालकांनी सांगितले.

Fake Sim Cards
LIC Part Time Job: LIC सोबत वीकेंडला फक्त काही तास करा काम, दर महिना होईल 80 हजारपेक्षा जास्त कमाई

बनावट/खोट्या माहितीच्या आधारे घेतलेले मोबाइल सीमकार्ड, सायबर गुन्हे, आर्थिक फसवणूक, राष्ट्रविरोधी करवायांसाठी वापरले जाऊ शकतात. आणि अशी बनावट कागदपत्रे तयार करणारे यात इतके चलाख असतात, की त्यांनी, अशी बनावट ओळखपत्रे, निवासाचे पुरावे तयार केले आहेत, जे मानवी नजरेतून कधीही पकडले जाऊ शकणार नाहीत. म्हणूनच, दूरसंचार विभागाने, असे सायबर गुन्हे रोखण्यासाठी एएसटीआर अस्त्र ह्या अत्याधुनिक प्लॅटफॉर्मचा वापर करत, अशा बनावट- खोट्या सीम्सचे जाळे उद्ध्वस्त केले आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com