
Best Double Decker Bus Mumbai: मुंबईकरांची लाडकी डबल डेकर बस आता ८५ वर्षांची झाली आहे. काल, ७ डिसेंबरला मुंबईच्या डबर डेकर बसचा ८५ वा वाढदिवस साजरा करण्यात आला. आता नवीन वर्षात डबल डेकर बस ही नव्या स्वरुपात येणार आहे.
७ डिसेंबर १९३७ साली सुरू झालेली डबल डेकर बससेवा आजही मुंबईकरांची लाइफलाइन आहे. आता ही डबल डेकर बससेवा आणखी अॅडव्हान्स आणि हायटेक होणार आहे. मुंबईतलीच नाही तर संपूर्ण देशातली पहिली डबल डेकर बस सेवा होती (Best Bus News)
मुंबईत डबल डेकर बसची (दुमजली बसची) सेवा ७ डिसेंबर १९३७ साली सुरू झाली होती. या सेवेला ८५ वर्षे पुर्ण झाली आहेत. डबल डेकर सेवा आता अॅडव्हान्स झाली असून नवीन वर्षात नव्या रूपात ही सेवा देण्यात येणार असल्याचं बेस्ट उपक्रम प्रशासनाने स्पष्ट केलं आहे.
पूर्वीच्या काळी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी बैलगाडी, टांगा किंवा टॅक्सीचा वापर करायचे. पण सिटी बसचा प्रवास बेस्टच्या मार्फत १९२६ मध्ये सुरू झाला. बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन अर्थात बेस्ट (BEST) या कंपनीनं सुरू केलेली ही बससेवा मुंबईतलीच नाही तर पूर्ण देशातली पहिली बस सेवा होती. (New Double Decker EV Bus In Mumbai)
अफगाण चर्च ते क्रॉफर्ड मार्केटपर्यंत पहिली बस धावली होती. नंतर सरकार आणि बीएमसीच्या आवाहनानुसार कंपनीने १९३४ मध्ये मुंबईच्या उत्तर भागात आपल्या सेवेचा विस्तार केला. १९३७ मध्ये डबल डेकर बस वापरात आणली गेली. मुंबई आणि देशातील पहिली मर्यादित बस सेवा १९४९ मध्ये कुलाबा ते माहिम अशी चालवली गेली होती. (Latest Marathi News)
दरम्यान मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबईकरांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी मुंबईकरांना प्रतिक्षा असलेल्या ईलेक्ट्रिक (EV) एसी डबल डेकरला नवीन वर्षात मकरसंक्रांतीला मुहूर्त मिळाला आहे. पहिल्या टप्यात ५० ईलेक्ट्रिक एसी डबल डेकर मुंबईकरांच्या सेवेत चालविण्यात येणार आहेत. (LIVE Marathi News)
तर डिसेंबर २०२३ पर्यत ९०० ईलेक्ट्रिक एसी डबलडेकर बस मुंबईकरांच्या सेवेत येणार आहेत, त्यामुळे बसने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना मोठा लाभ मिळणार आहे. या ईलेक्ट्रिक एसी डबल डेकर बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, पुश बॅक सिट्स, सिट्स समोर लॅपटॉप ठेवण्यासाठी जागा, वातानुकूलित अशी लक्झरी सेवा मिळणार आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.