Breaking: डाॅ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपींवर दोषारोप निश्चित

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर (Narendra Dabholkar) हत्या प्रकरणातील पाच आरोपींवर दोषारोप निश्चीत झाले आहे .
Breaking: डाॅ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपींवर दोषारोप निश्चित
Breaking: डाॅ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपींवर दोषारोप निश्चितSaam TV

पुणे - महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर (Narendra Dabholkar) हत्या प्रकरणातील पाच आरोपींवर दोषारोप निश्चीत झाले आहे . विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी पार पडली. डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे Sachin Andure , शरद कळसकर Sharad Kalaskar, अॅड. संजीव पुनाळेकर Sanjiv Punekar आणि विक्रम भावे Vikram Bhave यांच्यावर आरोप निश्‍चिती झाली आहे.

आज अॅड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे प्रत्यक्ष उपस्थित होते बाकी आरोपी ऑनलाइन उपस्थित होते. दोषारोप निश्चित झाल्यानंतर आता खटला सुरु होणार आहे. पुढील सुनावणी 30 सप्टेंबर रोजी होणार आहे. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे सध्या जामिनावर आहे.

Breaking: डाॅ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपींवर दोषारोप निश्चित
अफगाणिस्तानात दोन भारतीयांचं अपहरण; एक पळाला तर दुसरा ताब्यात

या गुन्ह्यात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) दाखल केलेल्या दोषारोपपत्रात डॉ. तावडे, अंदुरे, कळसकर यांच्याविरोधात कट रचणे, हत्या करणे, बेकायदा हालचाली प्रतिबंधक कायद्यानुसार (यूएपीए) आरोप ठेवण्यात आला आहेत. तर अॅड. पुनाळेकर आणि भावे यांच्याविरोधात पुरावे नष्ट केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहेत. तावडे, अंदुरे आणि कळसकर हे कारागृहात असून ॲड. पुनाळेकर आणि भावे जामीनावर आहेत. आज पुणे कोर्ट काय निर्णय देतं याकडे सर्वांचे लक्ष लागून होतं.

Edited By: Pravin Dhamale

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com