Pune: डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा नववा स्मृतीदिन; अंनिसतर्फे निर्भय मॉर्निंग वॉकचे आयोजन

Dr. Narendra Dabholkar's ninth memorial day: डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची २० ऑगस्ट २०१३ रोजी शनिवार पेठेतील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर हत्या करण्यात आली होती.
Dr. Narendra Dabholkar's ninth memorial day
Dr. Narendra Dabholkar's ninth memorial dayज्ञानेश्वर हिंगोलीकर

ज्ञानेश्वर हिंगोलीकर

पुणे: महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन संघर्ष समितीचे संस्थापक दिवंगत डॉक्टर नरेंद्र दाभोलकर (Dr. Narendra Dabholkar) यांचा आज नववा स्मृतिदिन आहे. याच निमित्ताने पुण्यात (Pune) आणि अंनिसतर्फे आज सकाळीच निर्भय मॉर्निंग वॉकचे आयोजन करण्यात आले आहे. ज्या ठिकाणी नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाली होती त्याच ठिकाणी जमत अंनिसच्या कार्यकर्त्यांनी या निर्भय मॉर्निंग वॉकच्या माध्यमातून दाभोलकर यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. (Pune Latest News)

हे देखील पाहा -

यावेळी मशाल पेटवत आम्हाला न्यायाची अपेक्षा अजून उरली आहे, असे म्हणत अंनिसच्या कार्यकर्त्यांनी तुम्ही दाभोलकरांची हत्या करू शकाल त्यांच्या विचारांची नाही असा इशारा देखील दिला आहे. या मॉर्निंग वॉकसाठी राज्यातील अनेक जिल्ह्यातून कार्यकर्ते पुण्यात आले होते.

डॉ. दाभोलकरांच्या हत्येचा घटनाक्रम:

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची २० ऑगस्ट २०१३ रोजी शनिवार पेठेतील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर हत्या करण्यात आली होती. घटनेच्या दिवशी साक्षीदार हे पुलावर साफ सफाई करीत होते. त्याची महिला सहकारी त्यावेळी तेथे होती. काम झाल्यानंतर ते पुलाच्या डिव्हाडरवर बसले होते. पुलाजवळील झाडावर एक माकड आल्याने आणि त्यामुळे कावळ्यांचा आवाज आल्याने त्यांनी त्या बाजूला पाहिले. तेव्हा त्यांना दोघांनी एकाला गोळ्या झाडल्या व त्यामुळे ती व्यक्ती खाली पडल्याचे पाहिले. गोळ्या झाल्यानंतर दोघे तरुण पोलिस चौकीच्या बाजूला पळाले. त्यानंतर त्यांनी दुचाकीवरून पळ काढला.

Dr. Narendra Dabholkar's ninth memorial day
मोठी बातमी! मुंबईवर २६/११ सारख्या घातक हल्ल्याची धमकी; कंट्रोल रुमला धमकीचा मेसेज

साक्षीदार डॉ. दाभोलकरांच्या जवळ गेले तेव्हा डॉ. दाभोलकर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. त्यानंतर साक्षीदार चित्तरंजन वाटीकेत साफ सफाईसाठी निघून गेले होते, अशी माहिती या खटल्यातील विशेष सरकारी वकील अॅड. प्रकाश सूर्यवंशी यांनी न्यायालयास दिली. हा सर्व घटनाक्रम साक्षीदारांनी साक्षीदरम्यान न्यायालयास सांगितला. तसेच अंदुरे आणि कळसकर यांनीच डॉ. दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडल्याचे न्यायालयास सांगितले होते.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com