Pradeep Kurulkar News: कुरूलकर प्रकरणी धक्कादायक माहिती उघड; इमेलद्वारे विदेशात माहिती, गेस्ट हाऊसमध्ये महिलांना भेटले

Pradeep Kurulkar News: 'डीआरडीओ'चे संचालक डॉ. प्रदीप कुरुलकर प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे.
Pardeep Kurulkar
Pardeep KurulkarSaam tv

अक्षय बडवे

pradeep kurulkar News: 'डीआरडीओ'चे संचालक डॉ. प्रदीप कुरुलकर प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. कुरुलकर प्रकरणाचा फॉरेन्सिक अहवाल प्राप्त झाला आहे. या अहवालातून कुरुलकर यांनी इमेलद्वारे विदेशात माहिती दिल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याचबरोबर गेस्ट हाऊसमध्ये महिलांना भेटल्याचे उघड झाले आहे. या माहितीने प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

डॉ. प्रदीप कुरुलकर प्रकरणाचा फॉरेन्सिक अहवाल प्राप्त झाला आहे. कुरुलकर यांनी ईमेलद्वारे काही महत्त्वाची माहिती दिल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यांनी परदेशात माहिती देण्यासाठी कुरुलकर हे एका ईमेल आयडीचा वापर केल्याचे समोर आलं आहे.

Pardeep Kurulkar
Ajit Pawar On Uddhav Thackeray: '...यातून जो धडा मिळाला पाहिजे तो मिळाला', उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यावर अजित पवारांचे स्पष्ट मत

तसेच डीआरडीओ येथील गेस्ट हाऊसमध्ये काही महिलांना देखील कुरुलकर भेटल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. कुरूलकर प्रकरणी धक्कादायक उघड झाल्यानंतर एटीएस देखील याच अनुषंगाने तपास करणार आहे.

कोण आहेत प्रदीप कुरुलकर?

शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर हे संरक्षण क्षेत्रातील मोठे नाव आहे. त्यांच्या क्षमतेमुळे त्यांची संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (DRDO) संशोधन आणि विकास आस्थापनेच्या प्रतिष्ठित प्रणाली अभियांत्रिकी प्रयोगशाळेचे संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. प्रदीप कुरुलकर यांची क्षेपणास्त्र क्षेत्रातील एक प्रमुख व्यक्तिमत्व म्हणून गणना होते.

Pardeep Kurulkar
Pune Cyber Fraud : १८ बँका, ४१ खाती अन् दिल्ली कनेक्शन; विम्याच्या बहाण्यानं डॉक्टरला २ कोटींना गंडा

क्षेपणास्त्र प्रक्षेपक, लष्करी अभियांत्रिकी गियर, अत्याधुनिक रोबोटिक्स आणि लष्करी अनुप्रयोगांसाठी मोबाइल मानवरहित प्रणालीची रचना आणि विकास यामध्ये कुरुलकर यांचे कौशल्य आहे. कुरुलकर यांनी एक टीम लीडर आणि लीड डिझायनर म्हणून अनेक लष्करी अभियांत्रिकी प्रणाली आणि उपकरणे डिझाइन, विकास आणि वितरणामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com