
मुंबई विमानतळावर सोन्याची करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा महसूल गुप्तचर संचालनालयाने पर्दाफाश केला आहे. महसूल गुप्तचर संचालनालयाने मुंबई विमानतळावर कोट्यवधी रुपयांच्या सोन्याची तस्करी करणाऱ्या ६ जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. या टोळीकडून साडेचार कोटी रुपयांचे ७.४ किलो सोने जप्त करण्यात आले आहे. (Latest Marathi News)
आंतरराष्ट्रीय टोळीकडून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून मोठ्या प्रमाणावर सोन्याची तस्करी सुरू होती. दुबई ते मुंबई हवाईमार्गे ही सोन्याची तस्करी सुरू होती. याच सोन्याची तस्करी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय सिंडिकेटचा डीआरआयने पर्दाफाश केला आहे.
डीआरआयने आरोपींकडून साडेचार कोटी रुपयांचे ७.४ किलो सोने जप्त केले आहे. या कारवाईत नामांकित एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्यासह एकूण सहा जणांना अटक करण्यात आली आहे. नामांकित विमान कंपनीची कर्मचारी, प्रवासी सोन्याची खेप स्वीकारणारा आणि पिता-पुत्र सोनारांना देखील अटक करण्यात आली आहे.
तसेच आरोपींकडून डायरी जप्त करण्यात आली आहे. याचबरोबर दररोज ४-५ प्रवासी कोट्यवधी रूपयांच्या सोने तस्करी करून आणत असल्याचे उघड झाले आहे, अशी माहिती डीआरआयने दिली आहे.
दर महिन्याला २०० किलो सोन्याची तस्करी
दुबईवरून सोने घेऊन निघालेला तस्कर मुंबई विमानतळावर विमान उतरताच सोने सीटवरच सोडत असे. त्यानंतर विमान कंपनीच्या मदतीने सोने विमानतळाबाहेर काढले जात असते. या आरोपींकडून दर महिन्याला २०० किलो सोन्याची तस्करी व्हायची, असा दावा डीआरआयने केला दावा आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.