कार चालवणे झाले महाग, सीएनजीचे दर 4 रुपयांनी वाढले

ही दरवाढ आज पहाटेपासून लागू करण्यात आली आहे.
कार चालवणे झाले महाग, सीएनजीचे दर 4 रुपयांनी वाढले
CNG Rate updates Saam Tv

मुंबई - पेट्रोल, डिझेल दरवाढीने आधीच सामान्यांचे कंबरडे मोडले असताना दुसरीकडे आता पुन्हा एकदा सीएनजी गॅसच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे आता मुंबईत (Mumbai) सीएनजी (CNG) कार चालवणे महाग झाले आहे. महानगर गॅस लिमिटेडने प्रति किलो मागे 4 रुपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे आता मुंबईकरांना सीएनजीसाठी प्रति किलोसाठी 76 रुपये मोजावे लागणार आहेत. ही दरवाढ आज पहाटेपासून लागू करण्यात आली आहे.

हे देखील पाहा -

नैसर्गिक वायू पुरवठ्याच्या किंमतीत 110 टक्क्यांनी भरघोस वाढ केल्यानंतर या किंमती वाढवण्यात आल्याचे कंपनीने सांगितले आहे. MGL ने 6 एप्रिल 2022 पासून तिसऱ्यांदा CNG च्या किमती वाढवल्या आहेत. एमजीएलने शुक्रवारी सांगितले की मुंबई आणि त्याच्या लगतच्या भागात शुक्रवारी मध्यरात्रीपासून सीएनजीची किंमत 76 रुपये प्रति किलो असेल. तसेच देशांतर्गत पीएनजीच्या किमतींमध्ये कोणतीही वाढ झालेली नाही.

CNG Rate updates
अंबाजोगाईत लाच मागितल्या प्रकरणी पोलीस अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्याला अटक

या ताज्या वाढीपूर्वी 1 ते 5 एप्रिल दरम्यान सीएनजीच्या किंमती प्रति किलो 6 रुपयांनी कमी झाल्या होत्या. त्यानंतर आता किलोमागे 16 रुपयांनी वाढ झाली आहे. राज्य सरकारने सीएनजीवरील व्हॅट 13.5 टक्क्यांवरून तीन टक्क्यांवर आणला होता, त्यानंतर त्याच्या किमती कमी करण्यात आल्या. मात्र आता महानगर गॅस लिमिटेडने प्रति किलो मागे 4 रुपयांनी वाढ केली आहे. ही दरवाढ आज पहाटेपासून लागू करण्यात आली आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.