नेवाळी मधील बुडून मृत्यू झालेल्या शुभमचा व्हिडिओ व्हायरल

शुभम भोईर याला होती क्रिकेट खेळाची आवड....
नेवाळी मधील बुडून मृत्यू झालेल्या शुभमचा व्हिडिओ व्हायरल
नेवाळी मधील बुडून मृत्यू झालेल्या शुभमचा व्हिडिओ व्हायरलSaam Tv

कल्याण: गुरुवारी सायंकाळी नेवाळी (Nevali) मधील दोन तरुणांचा नेवाळी पाडा येथील गणेश घाटात बुडून मृत्यू झाला. नेवाळी मध्ये राहणारा शुभम भोईर याला क्रिकेटची प्रचंड आवड होती. त्याच्या मृत्यूनंतर गावावर चुकलेच वातावरण पसरले असताना त्याचा क्रिकेट खेळतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

नेवाळी गावात राहणार शुभम भोईर आणि चांद पाटील हे दोन तरुण नेवाळी पाडा येथील गणेश घाटावर गुरुवारी पोहण्यासाठी गेले होते. मात्र सायंकाळ झाली तरी मुलं घरी आली नसल्याने कुटुंबियांनी शोध मोहीम सुरू केली. या नंतर या दोन्ही तरुणांचे मृतदेह गावकऱ्यांना दिसून आले.

गावकऱ्यांनी दोघांचे मृतदेह बाहेर काढत रुग्णालयात दाखल करण्यासाठी घेऊन गेले होते. मात्र त्याचा त्याआधीच मृत्यू झाला होता. या नंतर दोघांचे मृतदेह उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आले आहेत. मात्र दोघांच्या अचानक जाण्याने गावावर मोठी शोककळा पसरली असून शुभम भोईर याचा क्रिकेट खेळतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

Edited By: Pravin Dhamale

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com