Climate Change: मायानगरी मुंबईसह ही शहरे समुद्र गिळंकृत करणार? काय आहे भविष्यातील धोका? जाणून घ्या

समुद्राच्या वाढत्या पाण्याच्या पातळीचा मुंबईतील किमान 1000 इमारतींना फटका बसणार आहे. किमान 25 किमी लांबीचा रस्ता खराब होईल.
mumbai
mumbaiSaam TV

मुंबई : जगभरातील वाढतं प्रदूषण येत्या काळात मोठं संकट घेऊन येणार आहे. तज्ज्ञ सातत्याने याबाबत इशारा देत असतात. समुद्रकिनारी वसलेल्या शहरांना याचा सर्वात मोठा धोका असल्याचं बोललं जातं. स्वप्ननगरी मुंबईची देखील अशी अवस्था होऊ शकतो. मुंबईसह देशातील कोची, मंगळुरू, चेन्नई, विशाखापट्टणम आणि तिरुअनंतपुरम येथील किनारी भाग पाण्याचीखाली जाण्याचा धोका आहे. येत्या आठ वर्षात म्हणजे 2030 पर्यंत या शहरांच्या काही भागांना जलसमाधी मिळण्याची शक्यता आहे. आज तकने याबाबतचं वृत्त प्रसारित केलं आहे. (Climate Chnage)

समुद्राची पातळी वाढल्यांतर काही लोकांना त्यांची घरे आणि व्यवसाय सोडावे लागतील. राहण्याची जागा बदलावी लागेल. 2050 पर्यंत तर या शहरांची स्थिती आणखी बिकट होईल. समुद्राच्या वाढत्या पाण्याच्या पातळीचा मुंबईतील किमान 1000 इमारतींना फटका बसणार आहे. किमान 25 किमी लांबीचा रस्ता खराब होईल.जेव्हा भरती येईल तेव्हा 2490 इमारती आणि 126 किलोमीटर लांबीचा रस्ता पाण्याखाली जाईल. (Latest Marathi News)

mumbai
Kalyan Crime : भयंकर! ८ वर्षीय चिमुकलीवर अल्पवयीन मुलाकडून बलात्कार; ब्लेडने वार करत केली हत्या

मुंबईतील ही प्रसिद्ध ठिकाणं पाण्याखाली जातील

RMSI या संस्थेने यावर्षी जुलैमध्ये एक अभ्यास केला होता. ज्यामध्ये हाजी अली दर्गा, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट, वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे, वांद्रे-वरळी सी लिंक, मरीन ड्राईव्हवरील क्वीन्स नेकलेस, हे सर्व बुडण्याच्या उंबरठ्यावर पोहोचतील, असे म्हटले होते. RMSI ने IPCC च्या सहाव्या हवामान मूल्यांकन अहवालातून हे विश्लेषण केले आहे. अशी स्थिती केवळ मुंबईतच होणार नाही तर कोची, मंगलोर, चेन्नई, विशाखापट्टणम आणि तिरुअनंतपुरमलाही वाढत्या समुद्र पातळीचा फटका सहन करावा लागणार आहे.

पृथ्वी मंत्रालयाच्या अहवालानुसार, 1874-2004 दरम्यान उत्तर हिंद महासागर दरवर्षी 1.06 ते 1.75 मिमी दराने वाढत होता. परंतु 1993 ते 2017 या काळात ते प्रतिवर्षी 3.3 मिमीच्या दराने वाढत आहे. जर तुम्ही 1874 ते 2005 पर्यंत पाहिले तर महासागर जवळपास एक फूट वाढला आहे. जागतिक तापमानवाढ हे समुद्राच्या पातळीत वाढ होण्याचे कारण असल्याचे हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे. जागतिक स्तरावर तापमानात एक अंश सेल्सिअसने वाढ झाल्यास वादळेही वाढतील. भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर चक्रीवादळांची संख्या गेल्या चार वर्षांत 52 टक्क्यांनी वाढली आहे.

mumbai
Mumbai Crime : मुंबईत भर रस्त्यात कोरियन तरुणीची छेड; संतापजनक घटनेचा VIDEO समोर, पोलिसांनी घेतली गंभीर दखल

चक्रीवादळं वाढतील

2050 पर्यंत तापमानात 2 अंश सेल्सिअसने वाढ झाली तर या चक्रीवादळ आणि वादळांच्या संख्येत लक्षणीय वाढ होईल. ती तीन पटीने वाढू शकते.

2050 पर्यंत चेन्नईतील 5 किलोमीटर लांबीचा रस्ता आणि 55 इमारतींना समुद्राच्या पुराचा सामना करावा लागेल. तसेच कोचीमध्ये समुद्राच्या पुरामुळे किमान 464 इमारती प्रभावित होतील. भरतीच्या काळात 1502 इमारती बाधित होतील. तिरुअनंतपुरममध्ये 349 ते 387 इमारतींचे नुकसान होणार आहे. विशाखापट्टणममध्ये 9 किलोमीटर लांबीचा रस्ता आणि 206 इमारती बाधित होणार आहेत.

भारतातील ही 12 ठिकाणे सर्वाधिक धोक्यात

2100 वर्षापर्यंत सर्वात जास्त धोका असलेल्या ठिकाणांमध्ये मुंबई, भावनगर, कोची, मुरगाव, ओखा, तुतीकोरीन, पारदीप, मंगलोर, चेन्नई, विशाखापट्टणम, कांडला यांचा समावेश आहे. 2100 पर्यंत भारतातील 12 किनारी शहरे सुमारे 3 फूट पाण्याखाली जातील. हा अभ्यास अमेरिकन अंतराळ संस्था नासाचा आहे. नासाने सी लेव्हल प्रोजेक्शन टूल तयार केले आहे. हे टूल IPCC अहवालात दिलेल्या माहितीनुसार कार्य करते. या अहवालात संपूर्ण जगाला उष्णतेचा तडाखा बसणार असल्याचे म्हटले आहे. कारण तापमान 4.4 अंश सेल्सिअसपर्यंत वाढू शकते. पुढील दोन दशकांत तापमान 1.5 अंश सेल्सिअसने वाढेल.

तापमान इतके वाढले की हिमनद्या वितळतील. नासाच्या प्रोजेक्शन टूलमध्ये जगाचा नकाशा बनवण्यात आला आहे. ज्यात कोणत्या वर्षी जगाच्या कोणत्या भागात समुद्राची पातळी किती वाढेल. यात 2100 पर्यंत भारतातील 12 शहरे अर्ध्या ते तीन फुटांपर्यंत समुद्राच्या पाण्यात बुडतील. कारण तोपर्यंत उष्णता इतकी वाढेल की समुद्राच्या पाण्याची पातळीही वाढेल.

Edit By- Pravin Wakchoure

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com