हेलिकॉप्टर अपघातामुळे राष्ट्रपती यांचा नियोजित कार्यक्रम रद्द ! (पहा Video)

राजभवन येथील नविन दरबार हॉलचे नियोजित उद्घाटन स्थगित करण्यात आले असल्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी सांगितले आहे.
हेलिकॉप्टर अपघातामुळे राष्ट्रपती यांचा नियोजित कार्यक्रम रद्द ! (पहा Video)
हेलिकॉप्टर अपघातामुळे राष्ट्रपती यांचा नियोजित कार्यक्रम रद्द ! (पहा Video)Saam Tv

रश्मी पुराणिक

मुंबई : राजभवन येथील नविन दरबार हॉलचे नियोजित उद्घाटन स्थगित करण्यात आले असल्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी सांगितले आहे. संरक्षण दलाच्या हेलीकॉप्टरला झालेल्या दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

राष्ट्रपतींचा नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. मुंबईमध्ये राष्ट्रपतींचा हा कार्यक्रम होणार होता. राजभवन मध्ये आज संध्याकाळी हा कार्यक्रम होणार होता. दरबार हॉलचे याठिकाणी उदघाटन होणार होते. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ४ वाजता राजभवन मुंबई येथील बांधण्यात आलेल्या हॉलचे उदघाटन होणार होते. तर या कार्यक्रमाचे प्रसारण राजभवनाच्या यु ट्यूब चॅनेल द्वारे होणार होते.

हेलिकॉप्टर अपघातामुळे राष्ट्रपती यांचा नियोजित कार्यक्रम रद्द ! (पहा Video)
बदनापुरमध्ये जादूटोणा करून गुप्तधन काढणाऱ्यांचा पर्दाफाश; 3 जणांना अटक

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते हे उद्घाटन आज होणार होते. संरक्षण दलाच्या हेलीकॉप्टरला झालेल्या गंभीर अपघाताच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपतींसोबत चर्चा करुन उद्घाटन सोहळा स्थगित करण्याचा निर्णय घेतला असल्याचे राज्यपालांनी यावेळी सांगितले. या सोहळ्यासाठी विशेष उपस्थित निमंत्रीतांसमोर प्रत्यक्ष राज्यपालांनी या बद्दल माहिती दिली.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.