Shivsena Political Crisis: 'या' कारणांमुळे एकनाथ शिंदे यांची शिवसेनेवरील नाराजी वाढली

शिवसेनेशी एकनिष्ठ असणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी बंड का केलं असा प्रश्न शिवसैनिकांना पडला आहे.
Eknath Shinde/ Shivsena
Eknath Shinde/ ShivsenaSaam TV

रश्मी पुराणिक -

मुंबई : शिवसेनेचे जेष्ठ आणि महत्वाचे नेते समजले जाणारे, तसंच सध्याच्या सरकारमध्ये नगरविकास मंत्री म्हणून कार्यरत असणारे मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्यांच्या तशा हालचाली देखील सुरु आहेत.

काल विधान परिषदेता निकाल हाती आल्यापासून शिंदे हा नॉट रिचेबल आहेत त्यामुळे आता शिंदे सेनेतून बाहेर पडणार का? आणि महाविकास आघाडी सरकार (MVA Goverment) पडणार का ? अशा चर्चा सुरु आहेत. मात्र एकनाथ शिंदे सध्या नाराज असल्याच्या चर्चा सुरु आहेत मात्र, ते का नाराज आहेत याबाबतची काही माहिती समोर आली आहे.

म्हणून शिंदे नाराज आहेत -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या प्रकृतीच्या कारणामुळे त्यांचे पुत्र तथा राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी शिवसेनेचा चार्ज घेतला. शिवाय प्रत्येक निर्णय प्रक्रियेत आदित्य ठाकरे वाढता हस्तक्षेप हे शिंदेच्या नाराजीचं प्रमुख कारण माणलं जात आहे.

Eknath Shinde/ Shivsena
Sanjay Raut on Eknath Shinde: महाराष्ट्राला अस्थिर करण्याचा प्रयत्न गुजरातच्या भूमीवर; संजय राऊतांचे गंभीर आरोप

तसंच युवासेनचे वरुण सरदेसाई यांचा एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असणाऱ्या ठाण्यावरती हस्तक्षेप वाढत असल्यामुळे शिंदे यांच्या मनात याबाबत खदखद होती अशी माहितीसमोर येत आहे.

दरम्यान, महाविकास आघाडी सरकार स्थापण झाल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी अनेक शिवसेना आमदारांना निधी नाकारला त्याऐवजी त्याच्या विरोधातील राष्ट्रवादी नेत्यांना त्यांनी निधी दिला. शिवाय निधी वाटपावरुन अनेक शिवसेना (Shivsena) आमदारांनी याआधी देखील पक्ष नेतृत्वाकडे तक्रार केली होती. मात्र त्यावरती काही तोडगा काढण्यात आला नव्हता त्यामुळे शिवसेना आमदारांची नाराजी वाढत गेली.

हे देखील पाहा -

दरम्यान, एकनाथ शिंदे नाराज असल्यामुळे त्यांना राज्यसभा, विधान परिषद निवडणुकीत त्यांना लांब ठेवण्यात आलं होतं. शिवाय एकनाथ शिंदे यांच्या खात्यात देखील आदित्य ठाकरे यांचा हस्तक्षेप वाढत होता. या सर्व कारणांमुळे एकनाथ शिंदेची नाराजी वाढली आणि अखेर त्यांनी बंडखोरीचा निर्णय घेतला असल्याचं बोललं जात आहे.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com