संरक्षक भिंतीनेच घेतला लोकांचा बळी

या पावसाने चेंबूर, विक्रोळी आणि भांडुप मध्ये रौद्र रूप दाखवत 25 जणांचा बळी घेतला आहे.
संरक्षक भिंतीनेच घेतला लोकांचा बळी
संरक्षक भिंतीनेच घेतला लोकांचा बळीजयश्री मोरे

मुंबईत एखादी झोपडी असण्याला फार महत्व आहे. त्यामुळे मुंबईत दाटीवाटीने घरे आहेत. त्यात पाहिलं तर अनेक झोपडपट्ट्या या मुंबईत आहेत. मुंबईत उंच - उंच इमारतीत तसेच उंच - उंच डोंगरावर लोक घर बाधत असून निसर्गाचं नुकसान देखील करत आहे. मुंबईकर शनिवारी रात्री झोपले असतांना मध्यरात्री नंतर मुसळधार पाऊस सुरू झाला आणि सखल भागात पाणी साचले. तर या पावसाने चेंबूर, विक्रोळी आणि भांडुप मध्ये रौद्र रूप दाखवत 25 जणांचा बळी घेतला आहे. due to wall collapse 25 people are dead in mumbai

चेंबूरच्या भारत नगर मध्ये BARC ची दोन वेगवेगळ्या ठिकाणी भिंत 5 ते 8 घरावर भिंत कोसळली आणि यात 15 जणांचा जीव गेला. 5 जण जखमी आहेत, तर भांडुप पश्चिमेला अमर कोर शाळेजवळ भिंत कोसळून एका युवकाचा जीव गेला. यात 3 जण जखमी आहेत. विक्रोळी येथील सुर्यानगर येथील डोंगरावर पंचशील नगर आहे, येथे दरड 6 ते 7 घरांच्या भिंतीवर कोसळली आणि याठिकाणी आता पर्यंत एकूण 9 जणांचा बळी गेला. एनडीआरएफ आणि अग्निशमन दल, पोलीस आणि स्थानिकांच्या मदतीने लोकांना बाहेर काढण्यात आले. पावसाने मदत कार्यात अडथळा येत होता. डोंगरावर ही दुर्घटना घडल्याने ढिगारा काढण्यास जास्त वेळ लागत होता.

हे देखील पहा -

याठिकाणी खासदार. आमदार आणि पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी भेट दिली. यंदा 200 मिमी. पेक्षा जास्त पाऊस पडला. दोन वर्षांपूर्वी या ठिकाणी संरक्षक भिंत बांधली गेली होती, त्यामुळे याठिकाणी जीवितहानी कमी झाली. मृतांच्या नातेवाईकांना सीएम रिलीफ फंड आणि डिझास्टर मॅनेजमेंट कडून पाच लाखांची मदत दिली जाणार आहे. यासोबत जखमींच्या उपचारांचा खर्च देखील उचलला जाईल अशी माहिती पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली. आदित्य ठाकरे यांनी आज विक्रोळी सुर्यनगर येथील दुर्घटनेची पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते.

संरक्षक भिंतीनेच घेतला लोकांचा बळी
तिसरी लाट अजून आली नाही, आरोग्य विभागाची तयारी पूर्ण: राजेश टोपे

चेंबूर, विक्रोळी आणि भांडुप याठिकाणी डोंगरावर अनधिकृत घरे बांधण्यात आली आहेत. अनेक वेळा पालिकेने नोटीसा देऊनही लोक त्याच ठिकाणी राहत आहे. त्यामुळे अनधिकृत बाधकाम करून ज्यांनी ही घर दिली आहे, त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा ही मागणी देखील होत आहे. पावसामुळे संरक्षक भिंत घरांवर पडल्यामुळे अनेकांचे जीव या संरक्षक भिंतींने घेतले आहे.

Edited By - Akshay Baisane

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com