मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्र्यांचं मोठं विधान; म्हणाले, 'आशिष शेलार...'

शिंदे गटाने बंडखोरी केल्यानंतर राज्याचे राजकीय समीकरण बदललं आहे. त्यानुसार भाजपने देखील जय्यत तयारी केली आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मोठं विधान केलं आहे.'
Devendra Fadnavis
Devendra Fadnavissaam tv

सूशांत सावंत

Devendra Fadnavis News : मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी भाजप जय्यत तयारी करताना दिसत आहे. राज्यात शिंदे गटाने बंडखोरी केल्यानंतर राज्याचे राजकीय समीकरण बदललं आहे. त्यानुसार भाजपने देखील जय्यत तयारी केली आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मोठं विधान केलं आहे.'मुंबई महापालिकेची लढाई ही महत्वाची आहे. आशिष शेलार हे शिलेदार आहेत. त्यामुळे केंद्राने त्यांच्यावर जबाबदारी दिली आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त करत देवेंद्र फडणवीस यांनी आशिष शेलार यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे.

Devendra Fadnavis
'शिवसैनिक असता तर बाळासाहेबांचा मुलगा...'; आदित्य ठाकरेंचा बंडखोर आमदारांवर जोरदार हल्लाबोल

भाजपचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज पदभार स्वीकारला. त्यावेळी भाजप कार्यालयाजवळ मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमले होते. त्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित केले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'राज्यात नवीन सरकार आल्यानंतर जबाबदारीमध्ये बदल केला आहे. आमच्या दोन युवा सहकाऱ्यांना जबाबदारी देण्यात आली आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कामाचा आवाका मोठा आहे. महामंत्री म्हणून त्यांनी ज्या प्रकारे त्यांनी प्रवास केला, मला विश्वास आहे की, आपल्याला वेगाने काम करणारे अध्यक्ष मिळाले आहे. भाजपचे काम सर्वव्यापी पोहोचवण्यासाठी ते निश्चितपणे काम करतील'.

Devendra Fadnavis
संजय राऊतांच्या अडचणी आणखी वाढणार ? पत्राचाळ प्रकरणी मुंबईत ईडीची पुन्हा छापेमारी सुरु

भाजपने पक्षाच्या मुंबई अध्यक्षपदी आशिष शेलार यांची नियुक्ती केली आहे. आशिष शेलार यांच्यावर भाष्य करताना फडणवीस म्हणाले, 'आशिष शेलार हे मुंबई अध्यक्ष याआधी देखील राहिले. त्यांच्या काळात पालिकेने गरुड भरारी घेतली. आम्ही त्यावेळी ८२ जागा जिंकलो. त्यावेळी महापौर आम्ही बसवला असता, पण आता ती कमतरता भरून काढण्यासाठी आता आशिष शेलार यांना आम्ही पाठवले आहे. मुंबई महापालिकेची लढाई ही महत्वाची आहे. आशिष शेलार हे शिलेदार आहेत. त्यामुळे केंद्राने त्यांच्यावर जबाबदारी दिली आहे'.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com