'जगभर मंदीचे वातावरण असताना...';राज्याच्या कर संकलनावर उपमुख्यमंत्री फडणवीसांनी केलं मोठं विधान

'जगभर मंदीचे वातावरण असताना महाराष्ट्रात मात्र कर संकलन वाढत आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
Devendra Fadnavis news
Devendra Fadnavis news saam tv

सुशांत सावंत

Devendra Fadnavis News : अमेरिका, युरोप यांसारख्या अनेक मोठ्या देशांच्या अर्थव्यवस्थेत चढ-उतारांचा काळ सुरु झाला आहे. जगभरातील अनेक देशात खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी कंपन्यांकडून आपल्या कर्मचाऱ्यांना नोकरीतून बाहेरचा रस्ता दाखवत आहे. त्यामुळे जगावर मंदीचं संकट गडद असल्याचे दिसून येत आहे. याचदरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी राज्याच्या कर संकलनावर मोठं विधान केलं आहे. (Latest Marathi News)

'जगभर मंदीचे वातावरण असताना महाराष्ट्रात मात्र कर संकलन वाढत आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

वर्ल्ड काँग्रेस ऑफ अकाऊंटंट्स २०२२ या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devenendra Fadnavis) यांनी हजेरी लावली. वांद्रे कुर्ला संकुल येथे हा कार्यक्रम पार पडला. आज देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचा समारोप झाला. यावेळी ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांची विशेष उपस्थिती आहे. द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडिया आणि इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ अकाऊंटंट्स या दोन्ही संस्थांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला.. या कार्यक्रमात जगातील हजारो सीए सहभागी झाले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी मार्गदर्शन केले.

Devendra Fadnavis news
Sanjay Gaikwad : ...अन्यथा भाजपसोबतची युती तुटेल; शिंदे गटातील आमदाराचा थेट इशारा

या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, ' कार्यक्रमात दोन पोडियम पाहून थोडं विचारात पडलो. आता डाव्या बाजूच्या की उजव्या बाजूच्या पोडियमवर बोलायचं ? माझा पक्ष उजव्या विचारणीचा असल्याने मी हा पोडियम निवडला. पण मला माहिती आहे की, सीए हे कधीही डाव्या किंवा उजव्या विचारसरणीचे नसतात. ते नेहमीच मधल्या रेषेत चालतात. पारदर्शकचा हा त्यांचा आत्मा आहे'.

'देशाची राजकीय राजधानी दिल्ली असली तरी, आर्थिक राजधानी मुंबई आहे. ही फक्त आर्थिक नव्हे तर मनोरंजनाचीही राजधानी आहे. स्वप्न पूर्ण करणारी राजधानी. तुम्ही सर्व ब्रँडअँम्बेसेडर आहात. गुंतवणूकदार तुमचे ऐकून गुंतवणूक करतात. महाराष्ट्र हा एनोव्हेशन व स्टार्ट अपची राजधानी होतोय. २५ टक्के इंडियन युनिकॉर्न महाराष्ट्रात तयार होत आहेत. उत्तम पायाभूत सुविधा आम्ही उभारत आहोत, असे फडणवीस पुढे म्हणाले.

'आपण ४.० पर्वात आहोत. पंतप्रधानांनी देशात ५जी ची घोषणा केली आहे. तुम्हाला वेगवान रस्ते व डाटा महाराष्ट्रात मिळेल. आपण एक देश एक कर या प्रणालीच्या दिशेने जात आहोत. त्यात पंतप्रधानांच्या सहीहून अधिक सीएच्या सहीस महत्त्व असेल. हे फक्त सीए यांच्या पारदर्शक कारभारामुळे शक्य झालं. तुमच्या मेहनतीमुळे हे शक्य होत आहे', असे फडणवीस म्हणाले.

Devendra Fadnavis news
Beed : 'राज्यापालांची काळी टोपी आणा, एक लाख रुपये मिळवा'; ठाकरे गटाने जाहीर केले बक्षीस

यावेळी फडणवीसांनी महाराष्ट्राच्या जीएसटी संकलनावर देखील भाष्य केलं. 'यंदा महाराष्ट्राचे जीएसटी संकलन वाढत आहेत. आर्थिक अकाऊंटॅबिलिटीमुळे देश घडतो. म्हणूनच जगभर मंदीचे वातावरण असताना महाराष्ट्रात मात्र कर संकलन वाढत आहे', अशी माहिती देवेंद्र फडणवीसांनी यावेळी दिली.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com