Cyber Crime: मुंबई सायबर विभागाचा ई-मेल आयडी हॅक

पाकिस्तान हॅकर्सनी मुंबई मधील सायबर पोलिस विभागाचा इमेल हॅक करून, सर्व शासकिय ईमेल आयडीवर एक फिशींग मेल डिलीव्हर करण्यात येत आहे.
Cyber Crime: मुंबई सायबर विभागाचा ई-मेल आयडी हॅक
Cyber Crime: मुंबई सायबर विभागाचा ई-मेल आयडी हॅकSaam Tv

मुंबई : पाकिस्तान Pakistan हॅकर्सनी Hackers मुंबई मधील सायबर पोलिस विभागाचा इमेल हॅक करून, सर्व शासकिय ईमेल आयडीवर एक फिशींग मेल डिलीव्हर करण्यात येत आहे. यामध्ये एक पीडीएफ फाईल देखील जोडली दिसत आहे. मुंबई पोलिसांच्या पूर्व सायबर पोलीस विभागातून हा ईमेल आल्याचे भासवण्यात आले आहे. पाकिस्तानी हॅकरने मुंबई पूर्व सायबर विभागाचे ईमेल हँक केल्याचे तपासात समोर आले आहे.

हे देखील पहा-

ईमेल हॅक करून, डाटा चोरी करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती सध्या मिळत आहे. फिशींग मेलमध्ये एक पीडीएफ फाईल ॲटच करण्यात आली आहे. हा मेल, यामधील लिंक तसेच पीडीएफ फाईल डाऊनलोड केल्यास आपली सर्व प्रकारची माहिती, आयडी संदर्भात सर्व तपशील हॅकर्सकडे जाण्याची शक्यता वर्तवली आहे. यामुळे शासकीय इमेल हॅक होण्याचाही धोका आहे. त्यामुळे शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांनी काळजी घ्यावी, असे आवाहन सायबर पोलिसांनकडून करण्यात आले आहे.

Cyber Crime: मुंबई सायबर विभागाचा ई-मेल आयडी हॅक
सणासुदीत महागाईचा भडका झाला कमी; औद्योगिक विकासदरात मोठी वाढ

मुंबई पोलिसांच्या पूर्व सायबर पोलीस विभागामधून हा ईमेल आल्याचे भासवण्यात आले आहे. महाराष्ट्र सायबर विभागाने याप्रकरणी सर्व राज्यामधील पोलीस आयुक्त आणि पोलीस अधिक्षकांना असा ईमेल आल्यास उघडला जाऊ नये, अशा सूचना दिले आहेत. सायबर विभागाचे पोलीस अधिक्षक संजय शिंत्रे यांनी या सूचना जारी केले आहेत. हा ईमेल स्पुफींगचा प्रकार आहे. यामध्ये एखाद्या व्यक्तीच्या नावाचा वापर करून, ईमेल पाठवण्यात येत आहे. पण प्रत्यक्षात हा ईमेल त्या व्यक्तीने पाठवलेला नसतो.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com