एकविरा देवीच्या दर्शनावरून परतताना भीषण अपघात, 3 भाविकांचा मृत्यू

मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मनोरजवळ इको कारचा भीषण अपघात झाला आहे.
एकविरा देवीच्या दर्शनावरून परतताना भीषण अपघात, 3 भाविकांचा मृत्यू
एकविरा देवीच्या दर्शनावरून परतताना भीषण अपघात, 3 भाविकांचा मृत्यू Saam Tv

पुणे : एकविरा देवीच्या दर्शनाकरिता गेलेल्या भाविकांवर काळाने घाला घातला. मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मनोरजवळ इको कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये ३ भाविकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. तर ९ जण गंभीर जखमी झाले आहेत. इको कार आणि कंटेनरची जोरदार धडक होऊन, पालघर जिल्ह्यामधील मनोरजवळ भीषण अपघात झाला आहे.

हे देखील पहा-

रविवारी संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास हा अपघात झाल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे. आवंढाणी गावाच्या हद्दीत माता हॉटेलच्या समोर गुजरात मार्गिकेवर भरधाव इको कारने कंटेनरला जोरात धडक दिली आहे. दर्शन घेऊन घरी परत येत असताना हा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये चालकासह ३ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एका महिलेचा समावेश आहे.

एकविरा देवीच्या दर्शनावरून परतताना भीषण अपघात, 3 भाविकांचा मृत्यू
इयरफोन लावून PUBG खेळणाऱ्या दोघांना ट्रेनने चिरडले

अपघातामध्ये हेमंत तरे (वय- ६०), राकेश तामोरे (वय- ४२) आणि सुषमा आरेकर (वय- ३२) अशी मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांची नावे आहेत. सर्व भाविक पालघर मधील दांडी या ठिकाणचे रहिवासी आहेत. अपघातामध्ये ९ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये ३ चिमुकल्यांचा देखील समावेश आहे. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com