अविनाश भोसले यांच्या मुलाच्या अडचणींमध्ये वाढ; 'ईडी'कडून दोषारोप पत्र दाखल

अविनाश भोसले यांचा मुलगा अमित भोसले याच्याविरुद्ध आता ईडीने न्यायलायात दोषारोपपत्र दाखल केले आहे.
Avinash Bhosale
Avinash BhosaleSaam TV

पुणे : प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले (Avinash Bhosale) हे सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत. अशातच आता त्यांच्या मुलाच्या अडचणींमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. अविनाश भोसले यांचा मुलगा अमित भोसले (Amit Bhosale) यांच्याविरुद्ध आता ईडीने (ED) न्यायलायात दोषारोपपत्र दाखल केले आहे.

मागील वर्षीपासून सुरू असलेल्या या चौकशीमध्ये "एआरए प्रॉपर्टीज" व अन्य २ जमिनीच्या प्रकरणात हे ६ हजार पानी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. अविनाश भोसले यांचे "एबीआयएल" हे मुख्यालय सरकारी अधिकारी यांच्यासाठी राखीव असलेल्या जागेवर आहे.

ही जमीन ED ने मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात जप्त केली होती. ईडीने ऑगस्ट 2021 मध्ये या प्रकरणाशी संबंधित चार कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. सदर जमिनीवर भोसले यांची 'ABIL' आणि इतर कंपन्यांची कार्यालयं आहेत.

पाहा व्हिडीओ -

ED ने २०१६ मध्ये भोसलेंविरुद्ध मनी लाँड्रिंग प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार, संबंधित सरकारी जमीन केवळ सरकारला हस्तांतरीत करता येऊ शकते, असं असताना देखील ही जमीन एका व्यक्तीने "एआरए" कंपनीला हस्तांतरित करीत नियम मोडले आहेतक.

मनी लाँड्रिंगच्या कारवाई दरम्यान, अनेक ठिकाणी शोध आणि जप्तीची कारवाई करण्यात आली. त्या कागदपत्रावरून "ईडी"ने अवनाश भोसले यांच्या मुलाविरुद्ध कारवाई केलीअसून याबाबतचं दोषारोप पत्र आता न्यायालयात दाखल करण्यात आलं आहे.

Avinash Bhosale
Maharashtra Politics: हे सरकार निवडणूक घेण्यासाठी घाबरतंय; आदित्य ठाकरेंचा घणाघात

अविनाश भोसले व व्यावसायिक सत्येन टंडन यांच्याविरुद्ध केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. हे दोषारोपपत्र येस बँक डीएचएफएलमध्ये (डिएचएफएल) तीन हजार 700 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी आहे. घोटाळ्याप्रकरणी सुरवातीला CBI ने त्यांना अटक केली होती त्यांनतर त्यांची ईडीने चौकशी केली. चौकशी दरम्यान त्यांना ईडीने अटकही केली आहे.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com