ED: एल्गार परिषद आणि भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी ईडीने मनी लाँड्रिंगचा गुन्हा केला दाखल

एल्गार परिषद आणि भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी ईडीने मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे.
ED
ED Saam TV

मुंबई: एल्गार परिषद आणि भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी ईडीने (ED) मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे. बुधवारी विशेष एनआयए न्यायालयाने ईडीला या संदर्भात नवी मुंबईतील तळोजा कारागृहात असलेले आरोपी वकील सुरेंद्र गडलिंग यांची चौकशी करण्याची परवानगी दिली आहे.

ED
Eknath Shinde | लढाई अवघड होती, ३० वर्षानंतर मुख्यमंत्री झालो : एकनाथ शिंदे

ईडीचे (ED) हे प्रकरण एल्गार परिषद-भीमा कोरेगाव हिंसाचारावर आधारित आहे. या प्रकरणात एनआयएने गाडगीळ यांच्यासह १६ जणांना अटक केली होती. विशेष न्यायाधीश राजेश कटारिया यांनी ईडीला १७, १८ आणि १९ ऑगस्ट रोजी गडलिंग यांची चौकशी करण्याची मुदत दिली आहे. गडलिंग हे नवी मुंबईच्या तळोजा कारागृहात आहेत.

ED
Gondia : देवरी चेक पोस्टवर 47 किलो गांजा जप्त; आरोपीला पोलिसांनी केली अटक

ईडीने (ED) मुंबई हायकोर्टात धाव घेत ओंकार ग्रुपच्या विकासकांना जमिन देण्याच्या विशेष पीएमएलए कोर्टाच्या आदेशाला आव्हान दिले आहे. मात्र ओंकार ग्रुपच्या विकासकांना मुंबई सत्र न्यायालयाने दिलेल्या जामीनात हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे.

ओंकार ग्रुपचे दोन विकासक बाबूलाल वर्मा आणि कमल किशोर गुप्ता यांना जानेवारी २०२१ मध्ये ईडीने मनी लाँड्रीग प्रकरणात अटक केली होती. दोन्ही आरोपींनी दोषमुक्तीसाठी अर्ज केला होता. मात्र या संदर्भात ईडी शुक्रवारपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश देणार आहे.

काय आहे प्रकरण?

हे प्रकरण ३१ डिसेंबर २०१७ रोजी पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेत केलेल्या कथित प्रक्षोभक भाषणांशी संबंधित आहे. दुसऱ्या दिवशी पुण्याच्या बाहेरील कोरेगाव-भीमा युद्ध स्मारकाजवळ हिंसाचार झाला. कथित माओवादी संबंध असलेल्या लोकांनी ही परिषद आयोजित केल्याचा दावाही पुणे पोलिसांनी केला होता. एनआयएने या प्रकरणाचा तपास हाती घेतला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com