Praful Patel : प्रफुल्ल पटेल ईडीच्या रडारवर, मुंबईतील मालमत्तेवर टाच

नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना ईडीकडून अटक झाल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल देखील ईडीच्या रडारवर आहेत.
Praful Patel
Praful Patel Saam Tv

मुंबई: नवाब मलिक आणि अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना ईडीकडून अटक झाल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल देखील ईडीच्या रडारवर आहेत. अंमलबजावणी संचालनालयाने (ED) आज गुरुवारी मुंबईतील वरळी येथील प्रफुल्ल पटेल यांचे सीजे हाऊसमधील घरावर मजल्यांवर जप्तीची कारवाई केल्याचे सांगण्यात येत आहे. इक्बाल मिर्ची प्रकरणाशी संबंधित ही कारवाई केल्याचे सांगितले जात असून, २०१९मधील हे प्रकरण आहे. यापूर्वी प्रफुल्ल पटेल यांची ईडीकडून चौकशी झाली होती. (Praful Patel Latest News)

Praful Patel
India vs West Indies 1st ODI Live : भारत-वेस्ट इंडिज पहिली वनडे उद्या, कधी आणि कुठे पाहाल?

मुंबईत इक्‍बाल मिरची व त्याच्या कुटुंबीयांच्या पाच मालमत्ता असल्याचे ईडीच्या (ED) तपासात निष्पन्न झाले आहे. त्यातील दोन मालमत्ता मेसर्स सनब्लिंग रिऍल्टर्स आणि मिलेनियम डेव्हलपर्स प्रा. लि. यांना विकण्यात आल्या आहेत. वरळीतील मालमत्ता 2011 मध्ये सनब्लिंग रिऍल्टर्सला विकण्यात आली होती. मिरची व मिलेनियम डेव्हलपर्स यांनी संयुक्तपणे सीजे हाऊस ही 15 मजल्यांची इमारत 2007 मध्ये बांधली. या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील 14 हजार चौरस फुटांची मालमत्ता 2007 मध्ये मिरची कुटुंबीयांच्या नावावर करण्यात आली.

हे देखील पाहा

Praful Patel
मोठी बातमी : सोनिया गांधींची ईडी चौकशी, काँग्रेसने महाराष्ट्रात रान पेटवलं

वरळीतील मालमत्तांच्या खरेदी-विक्री व्यवहाराचा लाभ मिरचीच्या कुटुंबीयांना मिळाला. सीजे हाऊस या मालमत्तेची कागदोपत्री खरेदी-विक्री दाखवत काळा पैसा व्यवहारात आणून पांढरा करण्यात आल्याचा ईडीला (ED) संशय आहे. त्यासाठी चेन्नईतील एका बॅंकेत बनावट खाते उघडण्यात आले. त्या खात्यातून ही रक्कम फिरवण्यात आली. या सर्व मालमत्ता बेनामी असल्यामुळे यापूर्वी टाच आणणे शक्‍य झाले नाही. सीजे हाऊसशी संबंधित मिलेनियम डेव्हलपर्स ही कंपनी पटेल यांच्याशी निगडित असल्याचा आरोप आहे. सनब्लिंकच्या व्यवहारात महत्त्वाचा होता. लंडनमध्ये झालेल्या बैठक मर्चंटने आयोजीत केली होती. त्या व्यवहारात त्याला पाच कोटी रुपये मिळाले होते.त्याच्या राष्ट्रीयकृत बॅंकेच्या खात्यात ही रक्कम जमा झाली होती. ही रक्कम मिर्चीच्या वतीने स्वीकारल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे.

मुंबईत 1993 मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट खटल्यातील एक प्रमुख आरोपी असलेल्या इक्‍बाल मोहम्मद मेमन ऊर्फ इक्‍बाल मिरची याला 1994 मध्ये तडीपार करण्यात आले होते. दाऊद इब्राहिम टोळीचा अमली पदार्थांचा व्यवसाय सांभाळणाऱ्या मिरचीला पकडण्यासाठी इंटरपोलने नोटीस जारी केली होती. अमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणात 1988 पासून मुंबई पोलिसांना हव्या असलेल्या मिरचीने 1995 मध्ये भारतातून पलायन केले. भायखळा येथे मिरची कुटुंबीयांचा मिरची विकण्याचा व्यवसाय होता. त्यामुळेच त्याला गुन्हेगारी जगतात "मिरची' हे टोपणनाव मिळाले. प्रामुख्याने मॅण्ड्रेक्‍स गोळ्यांच्या तस्करीसाठी कुप्रसिद्ध असलेल्या मिरचीने दुबईत साम्राज्य निर्माण केले होते. 14 ऑगस्ट 2013 रोजी त्याचा लंडनमध्ये मृत्यू झाला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com