कुणाला तरी खुश करण्यासाठी ईडीने अफवा पसरवू नये - नवाब मलिकांचा ईडीला टोला

नवाब मलिक ईडीच्या रडारवर आहेत असं सांगितलं गेले, ईडीने अफवा पसरवू नये. पत्रकार परिषद घेऊन ईडीने खरं काय ते सांगावे. असं आव्हान मलिकांनी ईडीला केलं आहे.
कुणाला तरी खुश करण्यासाठी ईडीने अफवा पसरवू नये - नवाब मलिकांचा ईडीला टोला
कुणाला तरी खुश करण्यासाठी ईडीने अफवा पसरवू नये - नवाब मलिकांचा ईडीला टोलाSaam Tv

सुशांत सावंत, मुंबई

मुंबई: राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी थेट सक्तवसुली संचालनालय (Enforcement Directorate - ED) अर्थात ईडीवर निशाणा साधला आहे. कुणाला तरी खुश करण्यासाठी ईडीने अफवा पसरवू नये, पत्रकार परिषद किंवा माध्यम परिपत्रक (प्रेस नोट) काढून ईडीने खुलासा करावा असं आव्हान मलिकांनी केले आहे. (ED should not spread rumors to please anyone - Nawab Malik slammed ED)

हे देखील पहा -

नवाब मलिक म्हणाले की, काल दुपारपासून माध्यमांमधून अफवा पसरवण्याचे काम काही सरकारी यंत्रणा करत आहेत. नवाब मलिक ईडीच्या रडारवर आहेत असं सांगितलं गेले, ईडीने अफवा पसरवू नये. पत्रकार परिषद घेऊन ईडीने खरं काय ते सांगावे. कोणाला तरी खुश करण्यासाठी हे षडयंत्र रचले जात आहे. सात प्रकरणांमध्ये राज्य सरकारने एफआयआर दाखल केल्या आहेत. आम्ही वक्फ बोर्डात आधीच क्लीन अप सुरू केले आहे. भाजपच्या एका माजी मंत्र्याने शेकडो एकर जमीन मंदिराची हडप केली आहे. मंदिराची जमीन त्या माजी मंत्र्याने कशी हडप केली हे आम्ही सांगणार आहोत. नवाब मलिक या धमक्यांना घाबरणार नाही, ही लढाई मी शेवट पर्यत घेऊन जाईन असं नवाब मलिक म्हणाले आहेत

कंगना रणौतचं पद्मश्री काढून घ्या

अभिनेत्री कंगणा रणौतने (kangana Ranaut) केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल मलिक म्हणाले की आम्ही कंगणाच्या या वक्तव्याचा कठोर शब्दात निषेध करतो. कंगणाने लाखो स्वातंत्र्य सैनिकाना अपमानित केले आहे. कंगणाला मनाला क्रीमचा डोस जास्त झाला म्हणून ती अशी वक्तव्य करत आहेत असा टोला लगावत केंद्र सरकारने कंगणाला दिलेला पद्मश्री पुरस्कार काढून घ्यावा आणि तिला तात्काळ अटक करावी अशी मागणी मलिकांनी केली आहे.

आधी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांकडे लक्ष द्या

एसटी कर्मचाऱ्यांच्या (ST Bus Strike) संपाबाबत मलिक म्हणाले की, सरकार एसटी कर्मचाऱ्यांबाबत गांभीर्याने विचार करत आहे. एसटी कर्मचाऱ्यांना पगारवाढ, महागाई भत्ता, दिवाळी बोनस आदि वेळेवर मिळाले पाहिजे, परंतु विलीनीकरण शक्य नाही. विलीनीकरण केल्यास राज्याला कर्ज घेऊन कर्मचाऱ्यांचा पगार देण्याची वेळ येईल. भाजप या संपामागे राजकारण करत आहे. केंद्रामधील भाजप सरकारने आधी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांकडे लक्ष द्यावे असा खोचक सल्ला मलिकांनी भाजपला दिला आहे.

कुणाला तरी खुश करण्यासाठी ईडीने अफवा पसरवू नये - नवाब मलिकांचा ईडीला टोला
ठाकरे- पवार सरकारला एक दिवस महाराष्ट्र सस्पेंड करेल : साेमय्या

ओबीसींच्या आरक्षणाशिवाय महाराष्ट्रात निवडणुका होणार नाही

ओबीसी आरक्षणाबाबत (OBC Reservation) मलिक म्हणाले की, या सगळ्या वर्गाला न्याय मिळाला पाहिजे. पण, भाजपचे एजंट कोर्टात जाऊन अडथळा आणतायत. आम्ही कायदा केला आहे, त्यानुसार निवडणुक होईल. आम्हाला पुर्ण विश्वास आहे की, हा कायदा टिकेल. ओबीसींच्या आरक्षणाशिवाय महाराष्ट्रात निवडणुका होणार नाही असा दावाही त्यांनी केला आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com