Breaking: अनिल परब यांना ईडीचे समन्स

अनिल परब यांच्या अडचीणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Breaking: अनिल परब यांना ईडीचे समन्स
Anil ParabSaam Tv

मुंबई: महाविकास आघाडीतील परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांना ईडीने समन्स बजावले आहे. दापोली रिसॉर्ट प्रकरणी हे समन्स पाठवले आहे. अनिल परब यांच्या अडचीणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परब यांना उद्या ईडीसमोर त्यांचे विधान नोंदवण्यास सांगितले जात आहे.

काही दिवसापूर्वी परिहवन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्या घरावर ईडीची धाड पडली होती. या धाडीत त्यांच्या घरातील कागदपत्रांची तपासणी करण्यात आली होती. आता ईडीने पुन्हा समन्स बजावले आहेत.

Anil Parab
Video : राऊतांच्या तक्रारीनंतर पोलिस 'ऍक्शन मोड'मध्ये, पोलिसांनी नोंदवले 2 जणांचे जबाब

ईडीने अनिल परब यांना दापोली येथील रिसॉर्ट प्रकरणी पाठवली असल्याचे बोलले जात आहे. दापोली रिसॉर्ट प्रकरणी या पूर्वी सदानंद कदम आणि संजय कदम यांचे जबाब नोंदवले होते.

परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्या घरावर अंमलबजावणी संचालनालयाने छापा टाकला होता. अनिल परब यांच्याशी संबंधित असलेल्या मुंबई, पुणे आणि दापोलीच्या ७ जागांवर ईडीकडून (Enforcement Directorate) धाड टाकण्यात आली होती.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com