Pune : मुंबई पाठोपाठ पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका ईडीच्या रडारवर; कोरोना काळात हेराफेरी झाल्याचा संशय

मुंबई पाठोपाठ आणखी दोन महापालिकेकडून ईडीने माहिती मागवली आहे.
Pune News
Pune News Saam tv

Pune News : मुंबई पाठोपाठ आणखी दोन महापालिकेकडून ईडीने माहिती मागवली आहे. कोरोना काळात हेराफेरी झाल्याचा संशय ईडीला आल्याने आणखी दोन पालिका ईडीच्या रडारवर आहेत. ईडीकडून पुणे पालिका आणि पिंपरी-चिंचवड पालिका या दोन महापालिकेची ईडीकडून चौकशी होण्याची शक्यता आहे. (Latest Marathi News)

Pune News
Government Employee: सरकारी कर्मचाऱ्यांना गुड न्यूज! सरकारच्या निर्णयाचा होणार मोठा फायदा

कोरोना काळात जम्बो कोविड सेंटर चालविण्यासाठी दिलेल्या कंत्राटाची माहिती पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाकडे मागितल्याची माहिती आहे. मुंबई पालिकेकच्या कोविड सेंटरबाबत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केल्याननंतर ईडीने मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांना समन्स बजावलं होतं.

मुंबई महापालिकेनंतर आता पुणे महापालिका (PMC) आणि पिंपरी चिंचवड महापालिका ईडीच्या (Ed) रडारवर असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकेतील अधिकाऱ्यांची चौकशी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

Pune News
Ashish Shelar : किंचित आणि वंचित; दरोडेखोराकडून मुंबई वाचवणं गरजेचं; शेलारांचा ठाकरे आणि वंचितच्या युतीवर घणाघात

पुणे महापालिका कोविड सेंटर प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी यापूर्वीच तक्रार केली होती. या तक्रारीनंतर महापालिकेची ईडीकडून चौकशी होण्याची शक्यता आहे. जम्बो कोविड सेंटर प्रकरणी एका चहा वाल्याच्या नावाने कंत्राट घेतल्याचा सोमय्या यांचा आरोप होता.

पुण्यात रॅपिड अँटिजन किटने खोटे रेकॉर्ड तयार केल्याच्या आरोप झाल्यानंतर पुणे महापालिकेकडून चौकशीही झाली. आता या सर्व प्रकरणात ईडीने विशेष लक्ष दिल्याची सूत्रांची माहिती आहे.

दरम्यान,  कथित कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी ईडीने बीएमसी आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना समन्स बजावण्यात आले होते. ईडीने इक्बाल सिंह चहल यांची एक तासांहून अधिक वेळ चौकशी केली होती.  

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com