एकनाथ खडसेंचा तीन वर्षांनंतर संपला वनवास, पुन्हा विधिमंडळात प्रवेश

एकनाथ खडसे यांनी विधान परिषद निवडणुकीत विजय मिळवला आहे.
एकनाथ खडसेंचा तीन वर्षांनंतर संपला वनवास, पुन्हा विधिमंडळात प्रवेश
Eknath KhadseSaam Tv

मुंबई: गेल्या तीन वर्षापासून माजी मंत्री राष्ट्रवादीचे (NCP) नेते एकनाथ खडसे विधिमंडळापासून दूर आहेत. आज अखेर त्यांचा हा वनवास संपला आहे. विधान परिषद निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला आहे. एकनाथ खडसे यांनी पहिल्या पसंतीची २७ मत घेत विजय मिळवला आहे.

भाजपमधील अंतर्गत राजकारणातून त्यांनी भाजपला रामराम ठोकला आणि राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर खडसे यांना राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीमध्येही नाव दिले होते, पण राज्यपाल यांनी ती यादी राखून ठेवली. त्यामुळे खडसे यांचा विधिमंडळातील प्रवेश लांबला होता, पण आज विधान परिषद निवडणुकीत (Election) एकनाथ खडसे यांनी विजय मिळवला आहे.

Eknath Khadse
MLC Elections: केंद्रीय निवडणूक आयोगानेही काँग्रेसचे आक्षेप फेटाळले; मतमोजणीला सुरुवात

राज्यात २०१४ मध्ये भाजपचे (BJP) सरकार आल्यापासून एकनाथ खडसे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले. तेव्हापासून एकनाथ खडसे यांच्या विरोधात भाजपमध्ये असल्याचे दिसत होता. अखेर खडसे यांच्यावर घोटाळ्याचे आरोप झाले. यातून त्यांनी मंत्री पदाचा राजीनामा दिला. पुन्हा २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारीवरुन डावलले होते. त्यामुळेही ते भाजपवर नाराज होते. यातून त्यांनी पक्षाला राजीनामा देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

Eknath Khadse
विधानपरिषद निवडणूक निकालाआधीच महाविकास आघाडीला मोठा झटका; 'या' मंत्र्याला ईडीची नोटीस

विधान परिषदेच्या निवडुकीत एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिल्यापासून त्यांच्या उमेदवारीवरुन चर्चा सुरु झाली होती. भाजप (BJP) खडसे यांचा पराभव करण्यासाठी प्रयत्न करणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती, भाजपला विधिमंडळात एकनाथ खडसे यांना प्रवेश करु द्यायचा नव्हता अस बोलले जात आहे, यासाठी भाजपमधील नत्यांनी प्रयत्न केले होते. पण अखेर एकनाथ खडसेंनी विधान परिषदेत विजय मिळवत विधिमंडळात प्रवेश केला आहे.

राष्ट्रवादीच्या रामराजे नाईक निंबाळकर यांना २७, एकनाथ खडसे यांना २९, राष्ट्रवादीला ५६ मत पडली आहेत. शिवसेनेच्या सचिन अहिर यांना २६, तर हामशा पाडवी यांना २६ तर काँग्रेसचे चंद्रकांत हांडोरे यांना २२ मत मिळाली आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com