खडसेंना झटका! ED ने दाखल केलं हजार पानी आरोपपत्र; पाहा Video

या जमीन घोटाळ्यात एकनाथ खडसेंचे जावई गिरीश चौधरींना ईडीने अटक केली आहे.
खडसेंना झटका! ED ने दाखल केलं हजार पानी आरोपपत्र; पाहा Video
खडसेंना झटका! ED ने दाखल केलं हजार पानी आरोपपत्र; पाहा Video Saam Tv

पुणे: पुणे भोसरी जमीन घोटाळा (Bhosari Land Scam) प्रकरणी ED ने एकनाथ खडसे (Eknath Khadase) आणि कुटुंबियांविरोधात १ हजार पानी आरोपपत्र दाखल केलं आहे. आरोपपत्रात एकनाथ खडसे, मंदाकिनी खडसे, गिरीश चौधरी एकनाख खडसेंचे जावाई यांच्या नावांचा समावेश आहे. या जमीन घोटाळ्यात एकनाथ खडसेंचे जावई गिरीश चौधरींना ईडीने अटक केली आहे.

एकनाथ खडसे महसूल मंत्री असताना त्यांनी पुण्यातील भोसरी येथे 3.1 एकर एमआयडीसीतील प्लॉट खरेदी करण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप 2016 मध्ये त्यांच्यावर झाला होता. 31 कोटी रुपयांची किंमत असलेल्या या भूखंडाची अतिशय नगण्य म्हणजे 3.7 कोटी रुपयांना विक्री झाल्याचा दावा करण्यात आला होता. बाजारमूल्य अतिशय कमी दाखवून जमिनीची खरेदी झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा भूखंड अब्बास उकानी यांच्या मालकीचा होता. या प्रकरणात मनीलाँड्रींग झाल्याचा संशय ईडीला असून तपास सुरू आहे.

खडसेंना झटका! ED ने दाखल केलं हजार पानी आरोपपत्र; पाहा Video
धक्कादायक! अल्पवयीन मुलाचे अपहरण करून विक्री करणारी टोळी गजाआड

दरम्यान, इडीने मनीलाँडरींग प्रकरणी गेल्या आठवड्यात राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आणि त्यांच्या कुटुंबीयांची ५ कोटी ७३ लाख रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणली होती. पुण्यातील भूखंड बळकावल्याप्रकरणी एकनाथ खडसे यांची इडीकडून चौकशी अद्याप सुरु आहे. भोसरी येथील MIDC च्या मालकीचा भूखंड खरेदी करताना गैरव्यवहार झाल्याचे आणि सरकारचे ६१ कोटी २५ लाख रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडेंवरती आहे. संबंधीत बाजारी मूल्य ३१ कोटी रुपये असताना त्याची नोंदणी केवळ ३.७५ कोटी रुपये इतकीच करण्यात आली असाही आरोप आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com