लढणाऱ्या प्रत्येकाला वाटतं विजय आपलाच पण...; कोर्टाच्या सुनावणीनंतर भाजप नेत्याचं वक्तव्य

'जे पक्ष आहेत ते आपल्याला हवा तसा अर्थ काढत आहेत. न्यायालय योग्य निर्णय घेईल.'
Uddhav Thackeray Vs Eknath Shinde
Uddhav Thackeray Vs Eknath ShindeSaam TV

सुशांत सावंत -

मुंबई : राज्यातील सत्तासंघर्षावर आज सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सुनावणी पार पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट (Eknath Shinde) आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या गटाच्या वकिलांनी कोर्टात युक्तीवाद केला. दोन्ही बाजुचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने आजची सुनावणी सोमवारपर्यंत पुढे ढकलली आहे.

याच पार्श्वभूमीवर भाजप नेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी बोलताना ते म्हणाले, 'जे पक्ष आहेत ते आपल्याला हवा तसा अर्थ काढत आहेत. न्यायालय योग्य निर्णय घेईल, लार्जर बेंचकडे जाण्याबाबत भूमिका घेऊ असा निर्णय घेतला आहे. लढणऱ्या प्रत्येकाला वाटतं की विजय आपलाच होईल मात्र, आम्हाला वाटलं म्हणून भावनेवर निर्णय होत नाही असंही ते यावेळी म्हणाले.

पाहा व्हिडीओ -

तसंच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केलेल्या वक्तव्यावर उत्तर देताना दरेकर म्हणाले, 'गर्वाचे राजकारण कुणी केले आणि त्याचा अंत काय झाला हे सर्वानी पाहिले आहे. शिवसेना (Shivsena) भाजप एकत्र लढले नंतर काय झालं आणि कशा पद्धतीने सरकार बनलं हे सर्वानी पाहिलं आहे.

दरम्यान, वॉर्ड रचनेत केलेल्या बदलांवर बोलताना ते म्हणाले, शिवसेनेने आपल्या सोयीची वॉर्ड रचना केली होती. सत्तेचा दुरुपयोग करत मनमानी केली होती. काँग्रेसला ते पसंत नव्हतं मिलिंद देवरा यांनी देखील मागणी केली होती असं दरेकरांनी सांगितलं. शिवाय जनतेच्या मनाचा आणि मताचा आदर करण्याचं काम या सरकारने केलं असल्याचंही ते म्हणाले.

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde
Parbhani : त्यानं लुटलेलं, आपल्याला लुटायला काय प्रॉब्लेम आहे : आमदार रत्नाकर गुट्टे

दरम्यान, आज शिवसेना नेत्यांनी पोलिस महासंचालकांची भेट घेत आपल्या पदाधिकाऱ्यांवरती खोटे गुन्हे दाखल केल्याचं सांगितलं आहे. शिवाय सरकार सुडबुद्धीने कारवाई करत असल्याचा आरोप देखील शिवसेना उपनेत्या नीलम गोर्हे (Neelam Gorhe) यांनी केला आहे.

याच प्रकरणावर बोलताना दरेकर म्हणाले, 'आपण पोलिस आयुक्त संजय पांडें कसं घरगडी केले होते. आज ते त्यांच्या कर्माची फळ भोगत आहे. कसे गुन्हे दाखल केले होते. खोटे गुन्हे दाखल करताना आपण कोणत्या मानसिकतेमध्ये होता, त्यामुळे शिंदे सरकार कधीच खोट गुन्हे दाखल करणार नाही असा दावा देखील त्यांनी यावेळी केला.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com