Raj Thackeray News: राज ठाकरेंच्या इशाऱ्याची प्रशासनाकडून गंभीर दखल; माहीमच्या समुद्रातील अनाधिकृत बांधकाम पाडणार

Raj Thackeray On Mahim : राज ठाकरे यांच्या या इशाऱ्यानंतर आता प्रशासन खडबडून जागं झालं असून राज ठाकरे यांच्या या वक्तव्याची गंभीर दखल घेण्यात आली आहे.
Raj Thackeray On Mahim Dargah
Raj Thackeray On Mahim DargahSaam TV

Mahim Dargah News: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी गुढीपाडवा मेळाव्यातल्या भाषणात काही खळबळजनक व्हिडीओ दाखवले. मुंबईतल्या माहिमच्या समुद्र किनाऱ्यावर अनधिकृतपणे मजार बांधली गेल्याचा व्हिडिओ राज ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्राला दाखवला. या अनधिकृत बांधकामावर कारवाई केली नाही, तर त्या मजारीसमोरच गणपतीचं मंदिर उभारू, असा इशारा राज ठाकरेंनी दिला.  (Maharashtra Breaking News)

Raj Thackeray On Mahim Dargah
Raj Thackeray Speech : छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगतो...! राज ठाकरेंनी सांगितला उद्धव ठाकरेंचा 'तो' किस्सा

दरम्यान, राज ठाकरे यांच्या या इशाऱ्यानंतर आता प्रशासन खडबडून जागं झालं असून राज ठाकरे यांच्या या वक्तव्याची गंभीर दखल घेण्यात आली आहे. माहिमच्या समुद्रातील अनाधिकृत बांधकाम पाडलं जाणार, अशी माहिती समोर येत आहे. (Latest Marathi News)

यासाठी मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून ६ जणांनी नियुक्ती देखील करण्यात आल्याची माहिती आहे. आज म्हणजेच गुरूवारी सकाळी ८ वाजता ही मजार हटवण्यात येणार असल्याची देखील माहिती आहे. यासाठी प्रशासनाने माहीम परिसरात बंदोबस्त वाढवला आहे.

राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात माहिम येथील समुद्रात अनाधिकृत मजार बांधली जात असल्याचा व्हिडीओ समोर आणला होता. माहीम समुद्रात अनधिकृतपणे जागा बळकावून कबर तयार करण्यात आली आहे. तिथे दर्गा तयार करण्यात येत असून आजूबाजूला अनधिकृत बांधकामही करण्यात आल्याचा दावा राज ठाकरे यांनी केला होता.

Raj Thackeray On Mahim Dargah
Raj Thackeray Speech : शिवसेना, धनुष्यबाण माझा की तुझा वाद पाहून वेदना झाल्या, राज ठाकरेंनी पहिल्यांदाच व्यक्त केल्या भावना

राज ठाकरे यांच्या या दाव्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी (Police) घटनास्थळी जाऊन या जागेची पाहणी केली. दरम्यान, हे अनधिकृत बांधकाम तोडण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी ६ जणांचं पथक तयार केलं आहे. हे पथक आज सकाळी ८ वाजता माहीमच्या खाडीत जाऊन त्या जागेची पाहणी करेल.

त्यानंतर अनधिकृत बांधकाम तोडलं जाईल. हे बांधकाम तोडण्यासाठी महापालिका पोलिसांची मदत घेईल. वरिष्ठ पोलीस अधिकारी या जागेची पडताळणी करणार आहेत. जिल्हाधिकाऱ्याच्या अख्त्यारीत जागा आहे. पोलीस आणि जिल्हाधिकारी दोघेही पाहणी करणार आहेत. अनधिकृत बांधकाम असेल तर पाडले जाणार आहे.

Edited by - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com