Ramdas Kadam : उद्धव ठाकरेंचा अभ्यास कमी; ते अडीच वर्ष मंत्रालयात गेलेच नाहीत, रामदास कदमांची टीका

शेतकऱ्यांना जी काही नुकसान भरपाई द्यायची असते ते सरकार देतं. ही गोष्ट उद्धव ठाकरेंना माहिती नसावी', असं रामदास कदम यांनी म्हटलं आहे.
Ramdas Kadam
Ramdas KadamSaam TV

मुंबई : परतीच्या पावसाने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना चांगलंच अडचणीत आणला आहे. हातात तोंडाशी आलेली पिके पुन्हा पाण्यात गेल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. त्याला धीर देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी रविवारी औरंगाबाद भागातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना धीर देण्याचे काम केलं. यावर आता बाळासाहेबांची शिवसेना शिंदे गटातील नेते रामदास कदम यांनी टीका केली आहे.

Ramdas Kadam
राष्ट्रवादीला पुढील पंधरा वर्ष आम्ही सत्तेत येऊ देणार नाही, दिवाळीत शंभुराज देसाईंनी फोडला राजकीय बॉम्ब

काय म्हणाले रामदास कदम?

'उद्धव साहेब स्वतः वेळ काढून संभाजीनगरला गेले होते. शेतकऱ्यांना भेटण्यासाठी, त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाची चौकशी करण्यासाठी, किंबहुना असे म्हणेल शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी. त्यांनी अडीच वर्षे मुख्यमंत्री पद भूषवलं, त्यांना माहिती पाहिजे, आजपर्यंत देखील राज्यात पाऊस सुरू आहे आणि पाऊस संपल्यानंतर किंवा थांबल्यानंतर पंचनामे होतात. त्यानंतरच शेतकऱ्यांना जी काही नुकसान भरपाई द्यायची असते ते सरकार देतं. ही गोष्ट उद्धव ठाकरेंना माहिती नसावी', असं रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी म्हटलं आहे.

Ramdas Kadam
Viral Video : भररस्त्यात बायको आणि गर्लफ्रेंडमध्ये हाणामारी; नवऱ्याने तिथंच काढली चप्पल अन्...

'उद्धव ठाकरेंचा अभ्यास कमी'

उद्धव ठाकरे यांचा अभ्यास कमी आहे. अडीच वर्षात ते मंत्रालयात गेलेच नाहीत. शासकीय कामात त्यांनी लक्ष घातलं नाही. जणू काही ते आज विरोधी पक्ष नेते आहेत, अशा पद्धतीने टीका चालली आहे. एकनाथ शिंदे यांचे काम पाहून तीन महिन्यांमध्ये घेतलेल्या निर्णयाचा धडाका हे पाहून त्यांच्या पाठीवर थाप मारली असती, तर महाराष्ट्राच्या जनतेला समाधान वाटलं असतं. आपलं मंत्रिपद गेलं म्हणून सुळाच्या भावनेने टीका करावी हे उद्धवजींना शोभा देणार नाही, अशी टीका रामदास कदम यांनी केली आहे.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com