मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अडचणीत वाढ; पुणे न्यायालयाकडून चौकशीचे आदेश, जाणून घ्या काय आहे कारण ?

न्यायालयाने या याचिकेची दखल घेतली असून या प्रकरणात चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
Eknath Shinde News
Eknath Shinde Newssaam tv

पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात संपत्तीची चुकीची माहिती दिल्याबद्दल पुण्यातील माहिती अधिकार कार्यकर्ता अभिषेक हरदास यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने या याचिकेची दखल घेतली असून या प्रकरणात चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणूक आयोगाला चुकीची माहिती दिली असल्याचा आरोप या याचिकेत केला आहे. या याचिकेची दखल आता न्यायालयाने घेतली आहे.

Eknath Shinde News
Maharashtra Rain Update Live: कुठे पूर, कुठे दरडी कोसळल्या; पावसाचा सर्वत्र हाहाकार, पाहा ताज्या अपडेट्स

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सन २००९, २०१४ ला १४७,कोपरी पाचपाखाडी विधानसभा निवडणुकीकरिता नामनिर्देशन पत्रा सोबत शपथपत्र सादर केले आहे. त्यानंतर त्यांनी २०१९ ला १४७,कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीकरिता नामनिर्देशन पत्रा सोबत शपथपत्र सादर केले. एकनाथ शिंदे यांनी सन २०१४ व २०१९ मध्ये निवडणुकीकरीता दिलेल्या नामनिर्देशनमध्ये अनेक तफावती दिसून येत असल्याचे या याचिकेत म्हटले आहे.

Eknath Shinde News
बघता बघता पूराच्या लोंढ्यासोबत वाहून गेला तरुण; व्हिडीओ व्हायरल

काय आहे प्रकरण?

एकनाथ शिंदे यांच्याविरोधात पुण्यात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेद्वारे एकनाथ शिेदे यांच्या निवडणूक शपथपत्रात गोलमाल असल्याचा आरोप करण्यात आला आहे. निवडणुकीआधी दाखल केलेल्या शपथपत्रात एकनाथ शिंदे यांनी शेतजमीन, वाहनं, मालमत्ता आणि शिक्षणाविषयीच्या माहितीत लपवाछपवी केली आणि यात माहितीत तफावत आढळून आली आहे, असा आरोप करण्यात आला आहे. अभिजित खेडकर, डॉ. अभिषेष हरिसाद यांनी ही याचिका दाखल केली आहे. वकील समीर शेख यांच्यामार्फत ही याचिका शिंदे यांच्याविरोधात दाखल करण्यात आली आहे.

एकनाथ शिंदे यांनी २००९,२०१४ च्या शपथपत्रात शेतजमीन नसल्याचे नमूद केले. पण २०१९ मध्ये त्यांच्या पत्नीने ठाणे जिल्ह्यातील चिखलगावात जमीन खरेदी केल्याचा उल्लेख आहे. चिखलगावच्या सर्वे नंबर ८४४,८४५ ही जमीन ६ ऑगस्ट २०१९ मध्येच खरेदी केल्याचे नमूद केले. तर २०१४,२०१९ मधीळ शपथपत्रात व्यवसाय, नोकरीच्या तपशिलामध्ये उत्पन्नाच्या स्त्रोतात शेतकरी अशल्याचे नमूद केलेले नाही, असं या याचिकेत म्हटले आहे.

तर गाड्यांच्या किंमतीतही लपवा छपवी केली असल्याचे या यचिकेत म्हटले आहे. २०१४ च्या शपथपत्रात आरमाडा गाडी आठ लाखाला खरेदी केली, तर २०१९ मध्ये हीच गाडी ९६,७२० रुपयांना खरेदी केल्याचे म्हटले आहे. २०१४ मध्ये स्कॉर्पिओ ११ लाखांना खरेदी केली होती. पण २०१९ मध्ये हीच गाडी १.३३ हजार रुपयांना खरेदी केल्याचे म्हटले आहे.

२०१४ च्या निवडणुकांमध्ये ६.९६ हजार रुपयांना घेतलेल्या बोलेरोची किंमत २०१९ मध्ये १.८९ हजार रुपयांना घेतल्याचे म्हटले आहे. २०१४ मध्ये एक टेम्पो ९२,२२४ रुपयांना खरेदी केल्याचे म्हटले आहे. पण २०१९ मध्ये या टेम्पोची किंमत २१,३६० रुपये इतकी दाखवली आहे. २०१४ च्या शपथपत्रात १७.७० लाखांना खरेदी केलेली इनोव्हा कार २०१९ मध्ये ६ लाख ४२ हजार रुपयांत खरेदी केल्याचे म्हटले आहे. ही तफावत शपथ पत्रात असल्याचे या याचिकेत म्हटले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com