
मुंबई: शिवसेना (Shivsena) आमदारांच्या बंडामागे भाजपच असल्याचे शरद पवार यांनी आज पुराव्यासह सांगितले. गुजरात आणि आसाममध्ये सत्ता कुणाची आहे हे सर्वांना माहिती आहे. गुजरातमधील भाजपचे खासदार माझ्या परिचयाचे आहेत. शरद पवार यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपवर (BJP) आरोप केला. यामुळे आता राज्यातील राजकाणात खळबळ उडाली आहे. (Sharad Pawar Latest News)
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ४२ आमदारांसह बंड केले आहे, त्यामुळे आता महाविकास आघाडी सरकार आता अडचणीत आल्याचे बोलले जात आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर शरद पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य केले.
यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले, शिवसेनेच्या आमदारांची आसाम आणि गुजरातला ज्या व्यवस्था करणारे जे लोक आहेत, ती अजित पवारांच्या परिचयाचे आहेत असं वाटत नाही. पण माझ्या परिचयाचे आहेत. सुरतला ज्यांनी व्यवस्था केली ते भाजपचे गुजरातचे अध्यक्ष पाटील ते मराठी आहेत. ते पार्लमेंटचे मेंबर आहेत. त्यांनी या आमदारांना मदत केली असेलतर याचा अर्थ काय समजायचा?, असा सवाल शरद पवार यांनी केला. तर आसाममधील सरकार भाजपचे आहे, तेथिल राज्य सरकार त्यांची व्यवस्था करत आहे, त्यामुळे आता वस्तुस्थिती स्पष्ट समोर आहे, कुणाचे नाव घेण्याची गरज नाही, असंही शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले.
माध्यमांशी बोलताना पवार पुढे म्हणाले, पॅसिद्धी माध्यमातून काही गोष्टी पुढे आल्या. जे सदस्य महाराष्ट्राबाहेर गेले, ते इथे आल्यावर लोकांना वस्तुस्थिती सांगतील आणि बहुमत सिद्ध करुन दाखवतील.याआधीही महाराष्ट्राने अशा प्रकारची परिस्थिती बघीतली आहे. मला खात्री आहे उद्धव ठाकरे (uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वात मविआ बहुमत सिद्ध करेल. गुजरात आणि आसाममधील परिस्थिती आम्हाला जास्त माहिती आहे. कोणता राष्ट्रीय पक्ष शिंदेंसोबत आहे हे सांगण्याची गरज नाही.
मला वाटत नाही महाराष्ट्रात भाजपचे नेते येवून त्या आमदारांना मार्गदर्शन करतील. राज्याबाहेरील परिस्थिती आम्हाला माहिती आहे. बंडखोर आमदारांना राज्यपालांकडे किंवा विधानसभेत तरी यावं लागेल. तसंच पवार पुढे म्हणाले, सुरत आणि आसाम मध्ये जे लोक व्यवस्था केले ते अजित पवारांच्या ओळखीचे आहेत असे वाटत नाही.
Edited By- Santosh Kanmuse
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.