Video : गुवाहाटीत प्रशासकीय हालचाली वाढल्या; बंडखोर आमदारांच्या महत्वाच्या कादगपत्रांवर सह्या

Signing of important documents of rebel MLAs viral video : एकनाथ शिंदेंना गटनेता जाहीर करण्यासाठी या सगळ्या हालचाली सुरू आहेत.
Video : गुवाहाटीत प्रशासकीय हालचाली वाढल्या; बंडखोर आमदारांच्या महत्वाच्या कादगपत्रांवर सह्या
Signing of important documents of rebel MLAs viral videoरामनाथ दवणे

मुंबई: शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडखोरीनंतर राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे. एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीमुळे मविआ सरकार धोक्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर गुहावटीत आता प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या महत्वाच्या कागदपत्रांवर सह्या करण्याला आता सरुवात झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे यांना विधानसभेतील आपला गटनेता जाहीर करण्यासाठी बंडखोर आमदारांच्या सर्व कागदपत्रांवर सह्या घ्यायला सुरुवात केली आहे. सोबतच त्यांनी घोषणाही दिल्या आहेत. (Eknath Shinde Latest News)

हे देखील पाहा

एकीकडे शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी विधानसभा बरखास्त होणार असल्याचे संकेत दिले आहेत तर दुसरीकडे भाजपकडूनही हालचालींना वेग आला आहे. शिवाय आदित्य ठाकरेंनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन मंत्री हे पद काढून टाकल्यानेही अनेक चर्चांना उधाण आलं आहे. संजय राऊत माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हणाले की, शिवसेना हा संघर्ष करणारा पक्ष आहे, जास्तीत जास्त काय होईल, सत्ता जाईल. ती परतही येईल. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधानसभा बरखास्तीच्या दिशेने सुरू आहे, असंही त्यांनी ट्विटमध्ये नमूद केलं आहे. त्यामुळे राज्याची वाटचाल राष्ट्रपती राजवटीकडे सुरू असल्याचे हे संकेत असल्याचं बोलले जात आहे.

Signing of important documents of rebel MLAs viral video
मोठी बातमी! महाराष्ट्राची वाटचाल राष्ट्रपती राजवटीकडे?; संजय राऊत यांचे 'या' ट्विटद्वारे संकेत

याच पार्श्वभूमीवर भाजपाच्या (BJP) गोटातही हालचालींना वेग आला आहे. भाजपने आपल्या सर्व आमदारांना भाजपाच्या पक्षश्रेष्ठींकडून विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. भाजपने "पुढचे ४८ तास संपर्कात राहा" असा आदेश आपल्या सर्व आमदारांना दिला आहे. तसंच कोणत्याही दौऱ्यावर आणि परदेशात जाऊ नका, कोणत्याही क्षणी तुम्हाला मुंबईत पोहचायला लागू शकतं त्यामुळे संपर्कात रहा असं भाजपने आपल्या सर्व आमदारांना सांगितलं आहे. भाजपने आपल्या सर्व आमदारांना अशा सूचना दिल्याने महाविकास आघाडीची धाकधूक आणखीन वाढली आहे. एकनाथ शिंदेंनी आपल्यासोबत ४० आमदार असल्याचं सांगितलं होतं. शिवसेनेचे एकुण ५५ आमदार आहेत, त्यातले सुमारे ४० आमदार एकनाथ शिंदेंसोबत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे त्यामुळे मविआ सरकार कोसळण्याच्या उंबरठ्यावर आहे. तर दुसरीकडे भाजपने वेट अॅन्ड वॉचची भूमिका घेतली असली तरी पडद्याआड प्रचंड हालचाली सुरू आहेत.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com