...तर आमदारकी रद्द होऊ शकते; संजय राऊतांचा बंडखोरांना इशारा

शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांनी १७ आमदारांसह बंड केल्याची माहिती मिळत आहे.
...तर आमदारकी रद्द होऊ शकते; संजय राऊतांचा बंडखोरांना इशारा
Sanjay Raut News, Sanjay Raut Latest Marathi News, Eknath Shinde NewsSaam TV

मुंबई: विधान परिषदेच्या निकालानंतर शिवसेनेत उभी फूट पडली आहे. मंत्री एकनाथ शिंदे १७ आमदारांसह गुजरातमध्ये गेले आहेत. गेल्या काही दिवसापासून एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या. राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. यावरुन शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना इशारा दिला आहे. जे आमदार शिस्त पाळणार नाहीत त्यांची आमदारकी रद्द होईल, त्यांना आमदारकीला सामोरे जावे लागले, असा इसारा संजय राऊत (Sanjay raut) यांनी दिला आहे. (Eknath Shinde latest News)

संजय राऊत म्हणाले, जे आमदार पक्षाची शिस्त पाळणार नाहीत, त्यांची आमदारकी रद्द होऊ शकते. त्या आमदारांना निवडणुकीला सामोरे जावे लागेल, असा इशारा राऊत (Sanjay Raut) यांनी दिला. आम्ही सुरतला जाणारे शिवसैनिक नाही. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आमचे सहकारी आहेत. आम्ही अजुनही त्यांची वाट पाहत आहे. मला विश्वासही आहे ते परत येतील. आमदारांना सुरतमधून इकडे यायच आहे, पण त्यांना मारहाण होत आहे, हे चुकीचे आहे. एकनाथ शिंदेंनी प्रेमाने परत यावे. शिवसेनेच्या आमदारांच्या संरक्षणासाठी मुंबईतील गुंड सुरतमध्ये बसले आहेत. आमच्या आमदारांचे संरक्षण करावे एवढी वाईट वेळ आली आहे. शिवसेनेच्या (Shivsena) आमदारांच्या स्वाभिमानाला धक्का लागला आहे. (Eknath Shinde latest News)

Sanjay Raut News, Sanjay Raut Latest Marathi News, Eknath Shinde News
शिवसेनेला दुसरा मोठा झटका; पक्षाचा संकटमोचक ईडीच्या रडारवर

विधान सभेत जेव्हा वेळ येईल तेव्हा आमदारांची संख्या मोजा, पूर्ण बहूमत सिद्ध होईल. एकनाथ शिंदे आमचे सर्वकाही आहेत, ते परत येतील असा आमचा विश्वास आहे. सुरतला आमदारांना मारहाण झाली आहे, ही अत्यंत गंभीर बाब आहे. केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी यात लक्ष घालावे. आमचे मंत्री भाजपसोबत होते, तेव्हा त्यांच्याकडे कोणती खाती होती, आता महाविकास आघाडीमध्ये चांगली खाती मिळाली आहेत, असंही संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले.

Sanjay Raut News, Sanjay Raut Latest Marathi News, Eknath Shinde News
LIVE: सूरतमधील हॉटेलमध्ये शिवसेनेचे ३० आणि दोन अपक्ष आमदार

शिवसेनेचा संकटमोचक ईडीच्या रडारवर

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या नाराजीनाट्यानंतर राज्याचे राजकारण सकाळपासून ढवळून निघाले आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि शिवसेना आमदाराच्या बंडखोरीमुळे पक्षाच्या गोटात खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे शिवसेना नेते, मंत्री अनिल परब (Anil Parab) यांची ईडीकडून ९ तासापासून चौकशी सुरू आहे. यामुळे शिवसेनेची दुहेरी कोंडी झाल्याचे पाहायला मिळत आहे.

परिवहन मंत्री अनिल परब यांना काल ईडीने दुसऱ्यांदा नोटीस धाडली. याआधी देखील अनिल परब यांना ईडीने समन्स जारी केले होते. मात्र, त्यावेळी परब नियोजित कार्यक्रमामुळे शिर्डी येथे होते. मात्र, ईडीने दुसऱ्यांदा समन्स जारी केल्यानंतर परब आज ईडी कार्यालयात हजर झाले. परब ईडी कार्यलयात हजर होताच ईडी अधिकाऱ्यांनी कसून चौकशी सुरू केली आहे. तब्बल ९ तास झाले तरीही परब यांची ईडी कार्यलयात चौकशी सुरू आहे. त्यामुळे परब यांच्या अडचणी वाढल्याच्या शक्यता वर्तवण्यात येत आहे.दापोली रिसोर्ट प्रकरणी ही ईडीकडून चौकशी सुरू आहे. याआधी परब यांच्या निकटवर्तीयांचीही चौकशी करण्यात आली होती. (Eknath Shinde latest News)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com