मोठी बातमी! शिवसेनेचे आणखी दोन आमदार गुवाहाटीकडे रवाना

शिवसेने नेते एकनाथ शिंदे यांनी ३३ आमदारांसह बंड केले आहे.
मोठी बातमी! शिवसेनेचे आणखी दोन आमदार गुवाहाटीकडे रवाना
Shivsena Eknath Shinde Latest NewsSaam TV

मुंबई: शिवसेनेचे (ShivSena) ज्येष्ठ नेते आणि राज्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. या बंडाची सर्वाधिक झळ शिवसेनेला बसल्याचे सध्या तरी चित्र दिसत असल्याचे बोलले जाते. शिंदे यांच्यासह ३३ आमदार गुवाहटीत गेले असल्याची माहिती आहे, यात शिवसेनेच्या आमदारांची संख्या वाढत आहे. आज आणखी दोन आमदार गुवाहटीसाठी निघाले आहेत. (Eknath Shinde latest News)

शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर आणि सदा सारवणकर गुवाहाटीसाठी निघाले असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या गोटातील आमदारांची संख्या वाढत असल्याची माहिती मिळत आहे.

Shivsena Eknath Shinde Latest News
रश्मी ठाकरे, संजय राऊत यांच्यामुळे शिवसेनेत खदखद सुरू झाली? राजकीय विश्लेषकांनी सांगितली नेमकी कारणे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच असतील : संजय राऊत

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी काही आमदारांसह शिवसेनेतून बंड केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं. शिवसेनेकडून (Shivsena) हे बंड मोडीत करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackreray) यांनी सुद्धा आज आपल्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून बंडखोरांना प्रत्युत्तर दिलं. त्यांनी मुख्यमंत्रीपद सोडण्याची तयारी दर्शवली. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आता वर्षा बंगला सोडणार असून मातोश्रीवर जाणार असल्याची माहिती संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकारांसोबत बोलताना दिली आहे. यासोबतच आम्ही लढत राहू, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच असतील असं संजय राऊत यांनी ठणकावून सांगितलं आहे. (Sanjay Raut Latest News)

मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर संध्याकाळी शरद पवार आणि काँग्रेस नेत्यांची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर बोलताना संजय राऊत यांनी शिवसेना आणि पर्यायानं महाविकास आघाडीची भूमिका स्पष्ट केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे आपली भूमिका मांडल्यानंतर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधकांना थेट आव्हान दिलं आहे. (Eknath Shinde latest News)

वेळ आली तर सभागृहात आम्ही बहुमत सिद्ध करु असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. इतकंच नाही तर मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरेच राहतील असंही राऊत यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं आहे. इतकंच नाही तर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे वर्षा निवास्थान सोडून मातोश्रीवर राहण्यासाठी निघाले असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली आहे. "मोह, माया, सत्ता, याचा आम्हाला अजिबात लोभ नाही, आम्ही लढणारे लोकं आहोत, आम्ही लढत राहू शेवटी सत्याचा विजय होईल" असं संजय राऊत म्हणालेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com