आम्हाला राष्ट्रीय पक्षाचा पाठिंबा; एकनाथ शिंदे यांनी सस्पेन्स वाढवला

एकनाथ शिंदे उद्या ४२ आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र राज्यपाल यांना देणार आहेत.
Eknath Shinde
Eknath ShindeSaam Tv

मुंबई: शिवसेना (Shivsena) नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. शिवसेनेच्या ४२ आमदारांनी बंड केल्याचे समोर आले आहे. या बंडामुळे राज्यातील राजकीय वातावरण आता चांगलेच ढवळून निघाले. आज संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपवर आरोप करत, बंड केलेल्या आमदारांनी २४ तासात आपली मागणी मुंबईत उद्धव ठाकरेंसमोर मांडावी विचार केला जाईल, असं आव्हान केले होते. हा प्रस्ताव एकनाथ शिंदे गटाने धुडकावला आहे, आता गुवाहाटीमधील एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत शिंदे यांनी एका नॅशलन पार्टीचा उल्लेख केले असल्याचे दिसत आहे, ही नॅशनल पार्टी नेमकी कोणती या चर्चांना आता उधाण आले आहे.

या व्हिडिओ मध्ये मोठा नॅशनल पक्ष म्हणजे भाजप असल्याचे बोलले जात आहे. या व्हिडिओत आपल्याला भाजपचा पाठिंबा असल्याचे स्पष्ट संकेत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झालेल्या आमदारांना आपले गटनेते एकनाथ शिंदे असल्याचे आमदार तानाजी सावंत यांनी जाहीर केले आहे. हा व्हिडिओ काही वेळापूर्वीच सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.

Eknath Shinde
महाविकास आघाडीचे सरकार बहुमत सिद्ध करेल; शरद पवारांनी व्यक्त केला विश्वास

या व्हिडिओत पुढे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणतात त्या नॅशनल पक्षाने पाकिस्तानला धडा शिकवलाय. तो पक्ष आपल्या पाठिमागे आहे. आपल्याला काही कमी पडू दिले जाणार नाही. आपण लढाई जिंकली आहे, असं या व्हिडिओत सांगितले आहे.

शिंदे गट उद्या राज्यपालांना आमदारांच्या सह्यांचे पत्र देणार

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गट उद्या शुक्रवारी आमदारांच्या सह्यांचं पत्र राज्यपालांना पाठवणार आहेत. या पत्रात ४२ आमदारांच्या सह्या असणार आहेत. आज आणखी काही आमदार येणार असल्याने त्यांच्या सऱ्ह्या घेऊन पत्र पाठवणार असल्याचे बोलले जात आहे.

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ४२ आमदारांसह बंड केल्याने राज्यातील महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. एकनाथ शिंदे गट उद्या राज्यपाल यांना पत्र देणार असल्याचे बोलले जात आहे.

Edited By-Santosh Kanmuse

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com