मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हवेतच थांबवले विमान?; भाषणाचा व्हिडीओ व्हायरल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Eknath Shinde
Eknath Shinde Saam Tv

मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्र दौरा सुरू केला आहे. राज्यभरात जाऊन शिंदे गटाचा मेळावा घेत, सत्कार स्वीकारत आहेत. या कार्यक्रमातील मुख्यमंत्र्यांची भाषणे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. काल मुख्यमंत्री शिंदे यांच्या भाषणाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवरुन शिंदे यांना नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मालेगाव येथे सभा होती. या सभेतील भाषणात शिंदे यांनी त्यांच्या कामाची माहिती दिली. बोलताना शिंदे यांनी एक विमानातील किस्सा सांगितला, पण हा किस्स्याची सोशल मीडियावर थट्टा सुरू झाली आहे. (Eknath Shinde Latest News)

Eknath Shinde
Har Ghar Tiranaga: पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियावरचा डीपी बदलला, देशवासियांना केलं 'हे' आवाहन

मालेगाव येथील सभेत बोलताना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले, मी एकदा विमानातून येत होतो, यावेळी मला लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांना फोन करायचा होता. यावेळी मी विमानातील पायलटला सांगितले, पाच मिनिटे विमान थांबवा. मला महत्वाचा फोन करायचा आहे. यावेळी त्या पायलटने १० मिनिटे विमान थांबवले. मुख्यमंत्र्यांच्या या किस्स्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे.

Eknath Shinde
Ajit Pawar: सरकार शेतकऱ्यांबाबतीत असंवेदनशील; अजित पवारांचा हल्लाबोल

सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. यावरुन सोशल मीडियावर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी या भाषणात विमान नेमकं कुठे थांबवले हे सांगितलेले नाही. त्यामुळे आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com