प्रकृती बिघडल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आजचे कार्यक्रम रद्द

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज दिवसभरातील कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
Eknath Shinde
Eknath Shinde saam tv

मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे आज दिवसभरातील कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. प्रकृती अस्वास्थ्यामुळे रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. कालच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बरे वाटत नव्हते. गेले काही दिवस ते सतत दौरे करत असल्याने त्यांना आज अस्वस्थ वाटू लागले त्यामुळे आज त्यांनी कार्यक्रम रद्द करत आराम करण्याचा निर्णय घेतला आहे. (Eknath Shinde Latest News)

गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राज्यभरात दौरे सुरू आहेत. नाशिक, औरंगाबाद यासह अन्य ठिकाणी दौरे सुरू आहेत. आजही त्यांचा दौरा ठरलेला होता, पण अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांनी आपला दौरा यासह सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत.

Eknath Shinde
कोण आहेत न्या. यू यू ललित? घेणार भारताच्या सरन्यायाधीश पदाची शपथ

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा

राज्यातील सत्तासंघर्षांचा पेच काही सुटण्याचं नाव घेत नाहीये. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गट विरुद्ध शिवसेना वादावर आज सुप्रीम कोर्टात (Supreme Court) महत्वाची सुनावणी पार पडली. कोर्टाने दोन्ही गटाचं म्हणणं ऐकून घेतलं. त्यानंतर या प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलण्यात आली. आता पुढील सुनावणी येत्या सोमवारी म्हणजेच ८ ऑगस्ट रोजी होणार आहे. दरम्यान, आजच्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने उद्धव ठाकरे यांना एक मोठा दिलासा दिला आहे. (Shivsena Latest News)

Eknath Shinde
Eknath Shinde-Amol Mitkari | जे चालवलंय ते बरे नाही शिंदे साहेब, फडणवीसांच्या नादाला...; आमदाराचं टीकास्त्र

आजच्या सुनावणीत शिवसेनेच्या निवडणूक आयोगासमोर असलेल्या प्रकरणाचा मुद्दा समोर आला. निवडणूक आयोगाच्या वतीने दातार यांनी बाजू मांडली. यावेळी दातार यांनी 'कोणताही पक्ष निवडणूक आयोगाकडे जेव्हा धाव घेतो, तेव्हा खरा कुणाचा यावर निर्णय घेणं हे निवडणूक आयोगाचं कर्तव्य आहे. निवडणूक आयोग स्वायत्त संस्था असून, आम्ही कागदपत्रं मागितली आहे. ही प्रक्रिया पूर्णपणे वेगळी आहे." असं सुप्रीम कोर्टात सांगितलं.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com