आम्ही सत्तेसाठी कधीही…”; एकनाथ शिंदेंचं बंडानंतर पहिलं ट्विट

एकनाथ शिंदे यांनी पहिलीच प्रतिक्रीया ट्विट करुन दिली आहे.
Eknath Shinde
Eknath ShindeSaam Tv

मुंबई: विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रातील राजकारण (maharashtra politics) आज (मंगळवार) सकाळपासून ढवळून निघाले आहे. शिवसेनेचे खंदे समर्थक नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde latest updates) हे सेनेचे (shivsena) सुमारे १७ आमदारांसह सूरतला (Eknath Shinde in Surat) गेल्याचे समजते. दरम्यान महाविकास आघाडी सरकार विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर सावरेपर्यंत शिंदेंनी दूसरा धक्का दिल्याची चर्चा आहे. आता एकनाथ शिंदे यांनी पहिलीच प्रतिक्रीया ट्विट करुन दिली आहे.

'आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत... बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे.. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही' अस ट्विट एकनाथ शिंदे यांनी केले आहे. (Political crisis in Maharashtra)

विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रातील राजकारण (maharashtra politics) आज (मंगळवार) सकाळपासून ढवळून निघाले आहे. शिवसेनेचे खंदे समर्थक नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde latest updates) हे सेनेच्या (shivsena) सुमारे 17 आमदारांसह सूरतला (Eknath Shinde in Surat) गेल्याचे समजते. दरम्यान महाविकास आघाडी सरकार विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर सावरेपर्यंत शिंदेंनी दूसरा धक्का दिल्याची चर्चा आहे. शिंदे हे गुजरात भाजपचे अध्यक्ष सीआर पाटील (Gujarat BJP chief C R Patil) यांच्याशी संपर्कात हाेते असेही समजते. (Eknath Shinde latest News)

Eknath Shinde
एकनाथ शिंदे आणि 'ऑपरेशन लोटस'मागे भाजपच्या महाराष्ट्राच्या या नेत्याचा हात?

शिंदे हे गुजरातमधील सुरत जिल्ह्यातील एका आलिशान हॉटेलमध्ये तळ ठोकून असल्याचे समजते. हॉटेलमध्ये ते आहेत त्याच्या बाहेर मोठा पोलीस (police) बंदोबस्त लावण्यात आला आहे. अनधिकृत व्यक्तींच्या हालचालींवर निर्बंध घालण्यात आले आहेत.

एकनाथ शिंदे यांच्या नाराजीमुळे उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये अस्थिरता निर्माण होऊ शकते, असा दावा राजकीय वर्तुळातून केला जात आहे. एकनाथ शिंदे (eknath shinde) आणि त्यांच्या समवेत असलेले अन्य आमदारांना गुजरात भाजपचे अध्यक्ष सी आर पाटील यांनी मदत केल्याची समजते. पाटील आणि शिंदे दे दाेघेही एकमेकांच्या संपर्कात असल्याचे समजते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com