Eknath Shinde latest News: भाजपमध्ये हालचाली वाढल्या, पण 'ती' चूक पुन्हा...; नेमकं काय घडतंय?

राज्यातील राजकीय भूकंपानंतर भाजपमध्येही जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत.
Eknath Shinde latest News: भाजपमध्ये हालचाली वाढल्या, पण 'ती' चूक पुन्हा...; नेमकं काय घडतंय?
Eknath Shinde latest News in Marathi, Political Crisis in Maharashtra SAAM TV

सुशांत सावंत/ मुंबई: शिवसेना नेते आणि राज्याचे मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे नाराज असून, ते गुजरातमध्ये समर्थक आमदारांसह गेल्याची माहिती समोर आल्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. महाविकास आघाडी सरकार कोसळेल, अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे. त्यात भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत गेले आहेत. भाजपचे राज्यातील नेतेही प्रतिक्रिया देत आहेत. केंद्र आणि राज्य भाजपमध्ये हालचाली वाढल्या असून, यावेळी सगळी सूत्रे दिल्लीतून हलणार असल्याचे सूत्रांकडून कळते. भाजपमध्ये हालचाली जरी सुरू झाल्या असल्या तरी, मागील वेळी केलेली चूक यावेळी भाजप पुन्हा करणार नाही, असे समजते. (Eknath Shinde latest News)

Eknath Shinde latest News in Marathi, Political Crisis in Maharashtra
मोठा राजकीय भूकंप! एकनाथ शिंदेंसह हे '१७' आमदार नॉट रिचेबल; मविआ सरकार धोक्यात?

एकनाथ शिंदे हे नॉट रीचेबल असल्यापासून महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारला धोका असल्याचं बोललं जात आहे. त्यात जवळपास १५ ते २० आमदारांसह शिंदे हे नॉट रीचेबल असून ते गुजरातमध्ये गेल्याचे सांगण्यात येत आहे. शिंदे नाराज असून, ते भाजपमध्ये प्रवेश करू शकतात, या चर्चेने जोर धरला असून, पुन्हा देवेंद्र फडणवीस सरकार सत्तेत येईल, असे राजकीय वर्तुळात बोललं जात आहे. (Political Crisis in Maharashtra News)

दुसरीकडे, राज्यातील राजकीय घडामोडींना (Maharashtra Politics) वेग आला असून, या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य भाजपमध्ये जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. यावेळी भाजपने सावध पावले उचलण्याचे धोरण अवलंबल्याचे कळते. यावेळी सर्व सूत्रे ही दिल्लीतून हलणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच मागील वेळी झालेली चूक भाजप पुन्हा करणार नाही, असे सूत्रांकडून सांगितले जाते.

Eknath Shinde latest News in Marathi, Political Crisis in Maharashtra
Eknath Shinde Live Updates: ...नाहीतर तुमचा आनंद दिघे झाला असता: नारायण राणे

एकनाथ शिंदे यांच्यासोबत नेमके किती आमदार आहेत, यावरून भाजप नेतृत्व पुढील दिशा ठरवणार आहे. स्पष्ट बहुमताची खात्री झाल्याशिवाय भाजप कोणतीही घाई करणार नाहीत, असेही सूत्रांकडून समजते.

देवेंद्र फडणवीस दिल्लीत

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दिल्लीमध्ये गेले आहेत. पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांची ते भेट घेतील. त्यांना राज्यातील घडामोडींची माहिती आणि राज्यात सरकार स्थापन करण्यासंदर्भात परवानगी, तसेच इतर फॉर्मेलिटी पूर्ण करण्यासाठी गेले असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

Edited By - Nandkumar Joshi

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com