Eknath Shinde Live Updates: ...नाहीतर तुमचा आनंद दिघे झाला असता: नारायण राणे

भाजप नेते नारायण राणे यांनी ट्विट करून नेमके काय संकेत दिले?
Eknath Shinde news in marathi
Eknath Shinde news in marathiSAAM TV

मुंबई: शिवसेना नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह पक्षाचे काही आमदार नॉट रीचेबल असल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळेल, अशा शक्यता व्यक्त केल्या जात आहेत. तर शिंदे हे गुजरातमध्ये असून, ते भाजपमध्ये प्रवेश करतील अशीही जोरदार चर्चा सुरू आहे. त्याचवेळी भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी एक धक्कादायक वक्तव्य केलं आहे. (Eknath Shinde news in marathi BJP Leader Narayan Rane Tweet On Political crisis in Maharashtra)

Eknath Shinde news in marathi
भाजपने पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा असा खेळ सुरू केला आहे : नाना पटोले

एकनाथ शिंदे 'नॉट रीचेबल' असून, राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. त्यात आता भाजप (BJP) नेत्यांनी प्रतिक्रिया देऊन संभ्रम वाढवला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ट्विट करून सूचक इशारा दिला आहे. शाब्बास एकनाथजी, योग्य वेळी योग्य निर्णय घेतलास. नाहीतर लवकरच तुझा आनंद दिघे झाला असता, असं ट्विट करून राणे यांनी खळबळ उडवून दिली आहे. आता नारायण राणेंच्या या प्रतिक्रियेचा नेमका अर्थ काय, याबाबत वेगळीच चर्चा सुरू झाली आहे.

Eknath Shinde news in marathi
Maharashtra Politics : गेम झाल्याचे माझे विधान सेना नेत्याने मनाला लावून घेतले : शिवेंद्रसिंहराजे

काही वेळापूर्वीही दिली होती सूचक प्रतिक्रिया

विधान परिषदेचा निकाल जाहीर झाल्यानंतर काही तासांनी राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे गुजरातमध्ये गेल्याचे कळते. ते नॉट रीचेबल आहेत. एकनाथ शिंदे आणि त्यांचा समर्थक गट नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. त्याचवेळी सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.

एकनाथ शिंदे संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहेत. याबाबत नारायण राणे यांना एका कार्यक्रमात प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी सूचक प्रतिक्रिया दिली. एकनाथ शिंदे हे कुठे आहेत याबाबत काही सांगावं लागत नाही. नॉच रीचेबल असण्याला काय अर्थ आहे? असा उलट प्रश्न त्यांनी विचारला. पुण्यात ते बोलत होते.

मनसेची प्रतिक्रिया

नेहमीच नॉट रीचेबल असणाऱ्या मुख्यमंत्र्यांना आता त्यांचेच आमदार नॉट रीचेबल...गुरूची विद्या गुरूला? असं ट्विट मनसे (MNS) नेते नितीन सरदेसाई यांनी करत, उद्धव ठाकरे यांना चिमटा काढला.

Edited by - Nandkumar Joshi

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com