Eknath Shinde and Sharad Pawar Together: शब्द पाळला! मुख्यमंत्री शिंदे आणि शरद पवार एकाच मंचावर

शब्द पाळला! मुख्यमंत्री शिंदे आणि शरद पवार एकाच मंचावर
Cm Eknath Shinde and Sharad Pawar Together
Cm Eknath Shinde and Sharad Pawar TogetherSaam Tv

Cm Eknath Shinde and Sharad Pawar Together: आज मुंबई सेंट्रल येथील मराठा मंदिर संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या सांगता कार्यक्रम पार पडला. राष्ट्रवादी सर्वेसर्वा शरद पवार या संस्थचे अध्यक्ष आहेत. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री उदय सामंत देखील उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी शरद पवार यांचे कौतुक केले.

शरद पवार यांनी स्वतः वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवास्थानी जाऊन त्यांना या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं होतं. मुख्यमंत्री शिंदे यांनीही आपला शब्द पाळत या कार्यक्रमाला हजेरी लावली आहे.

Cm Eknath Shinde and Sharad Pawar Together
Rain News: नदी, डोंगर, छतावर बरसला, पाऊस हा पुन्हा परतला! मुंबई-पुण्यात वातारण झालं आल्हाददायक

या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री ऐकनाथ शिंदे म्हणाले की, संस्था अनेक निर्माण होतात. पण सातत्याने या संस्था कार्यरत राहणे टिकवणे सोपे नसते. ते म्हणाले, ''या संस्थेबद्दल किती बोलले तरी कमी पडेल. (Marathi Tajya Batmya)

मुख्यमंत्री म्हणाले, बोलल्यानंतर मार्ग निघतात, कटुता राहत नाही. निवडणूक झाली की राजकीय आखाडा संपवला पाहिजे.पवार साहेब फोन करतात, त्यांच्या अनुभवाचा फायदा घ्यायला काय हरकत आहे? असे देखील शिंदे म्हणाले. (Latest Political News)

Cm Eknath Shinde and Sharad Pawar Together
Kokan Ganpati Festival: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी गुड न्यूज; मध्य रेल्वेने केली मोठी घोषणा

शिंदे म्हणाले, कोरोनामुळे कार्यक्रम झाले नाही. मात्र योगागोग असेल मी मुख्यमंत्री असताना कार्यक्रम झाला. पवार यांचे मी आभार मानतो, त्यांची आमंत्रण दिलं. ते वर्षावर आले होते. ते फोनवरही बोले असते तरी चाललं असतं. मी सांगितलं होतं, मी येणार म्हणजे येणार. आज हेलीकॉप्टर बंद पडला. मी रस्त्याने आलो. शब्द दिला होता या कार्यक्रम येणार म्हणजे येणार. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com