
मुंबई: एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) बंडानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळण्याच्या उंबरठ्यार असतानाच एकनाथ शिंदेनी यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. मी शिवसैनिक असून मी शिवसेनेतच (Shivsena) राहणार असं ते म्हणाले आहे. एका मराठी एका वृत्तवाहिनीला फोनद्वारे स्वतः एकनाथ शिंदेंनी माहिती दिली आहे. एकनाथ शिंदे म्हणाले की, आमच्यासोबत शिवसेनेचे ४६ आमदार आहेत. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. आम्ही बाळासाहेबांचं हिंदुत्व घेऊन पुढे जातोय. सत्तेसाठी बाळासाहेबांच्या हिंदुत्वाशी तडजोड करणार नाही. आमची रणनीती पुढे कळेलच असं शिंदे यांनी स्पष्टे केलं आहे. त्याचप्रमाणे अजय चौधरी गटनेते झाले याबाबत ते म्हणाले की, गटनेता निवडण्याची ती पद्धत नियमबाह्य आहे. गटनेता निवडण्यासाठी बहुमत लागते. याबाबत मी जास्त बोलणार नाही. तसेच आपण शिवसेनेतच आहे, बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे, आणि शिवसेनेतच राहणार असं ते म्हणाले आहेत. (Eknath Shinde Latest News)
हे देखील पाहा -
शिवसेनेचे नेते तथा राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकारविरोधात बंड पुकारल्यामुळे शिवसेनेसह आघाडीतील मित्र पक्षांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्या बंडाच्या चर्चा कालपासून राज्यासह देशभर सुरु आहेत. साम टीव्हीशी बोलत असताना आपण हिंदुत्वाशी फारकत घेऊ शकत नाहीत असं म्हटलं आहे. तसंच आपण शिवसेना (Shivsena) सोडली नाही आणि सोडणार नाही असंही ते म्हणाले आहेत.
सामशी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले होते की, सत्तेसाठी असो वा राजकारणासाठी आम्ही हिंदुत्वाच्या मुद्दयावर फारकत घेऊ शकत नाही. तसंच जे हिंदुत्व बाळासाहेबांचे आहे ते हिंदुत्व आणि तीच कडवट भूमिका घेऊन आपण या पुढील राजकारण समाजकारण करणार असल्याचंही शिंदे म्हणाले. शिवाय आम्ही शिवसेना सोडली नाही आणि सोडणारही नाही असंही एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले आहेत. शिवसेनेसह राज्यातील आघाडी सरकारविरोधात बंड पुकारणारे एकनाथ शिंदे यांनी आपला गुजरातमधील मुक्काम आता गुहावाटीला हलवला आहे. आजचा त्यांचा मुक्काम गुवाहाटीतच असल्याचंही ते म्हणाले.
या सगळ्या राजकीय घडामोडींनंतर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत खळबळ उडवून दिली होती. शिवसेना संघर्ष करणारा पक्ष असून, जास्तीत जास्त सत्ता जाईल. ती परत येईल, असे ते म्हणाले होते. त्यानंतर काही वेळातच संजय राऊत यांनी ट्विट करून महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधानसभा बरखास्तीच्या दिशेने सुरू असल्याचे ट्विट केले. या ट्विटमुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागणार का? अशा शक्यतांबाबत चर्चा सुरू झाली आहे.
Edited By - Akshay Baisane
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.