Maharashtra Politics : नितीन देशमुखांचे 'ते' दावे खोटे? एकनाथ शिंदे गटाकडून विमानातले फोटोज् व्हायरल

Political Crisis In Maharashtra : या फोटोंची सत्यता अजूनही समोर असल्याने कोण खरं आणि कोण खोटं याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
eknath shinde supporters viral shivsena mla nitin deshmukh photo
eknath shinde supporters viral shivsena mla nitin deshmukh photoSaam Tv

मुंबई : महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला असतानाच एकनाथ शिंदेंसोबत जाऊन परत आलेले आमदार नितीन देशमुख (Nitin Deshmukh) यांनी गुजरातमधला थरारक अनुभव सांगितला होता. सूरतमध्ये माझा घात करण्याचा डाव होता. जबरदस्तीने माझ्या दंडात इंक्जेक्शन टोचण्यात आलं होतं. मी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav Thackeray) यांच्यासोबत आहे, असं देशमुख यांनी जाहीर केलं होतं. मात्र आता यातही नवा ट्विस्ट आला आहे. आमदार नितीन देशमुखांचा मी स्वतःची सुटका करून पळून आलो हा दावा खोटा असल्याचं शिंदे गटाचं म्हणणं आहे. शिंदे समर्थकांनी आमदारांचे फोटो व्हायरल करत नितिन देशमुख यांचा दावा मोडून काढला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या गोटात पुन्हा खळबळ उडाली आहे. मात्र या फोटोंची सत्यता अजूनही समोर असल्याने कोण खरं आणि कोण खोटं याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. (Eknath Shinde Latest News)

हे देखील पाहा -

एकनाथ शिंदे गटाने काही फोटोज व्हायरल केले आहेत. यात शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख हे स्पष्ट दिसत आहे. यात दावा करण्यात आला आहे की, नितिन देशमुख यांचा गुवाहाटी ते अकोला हा परतीचा प्रवास खाजगी विमानाने झाला. एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी सन्मानाने त्यांना अकोल्याला पोहोचलं असं शिंदे समर्थकांचं म्हणनं आहे. याबाबत त्यांची छायाचित्रे व्हायरल केल्याने नितीन देशमुखांनी केलेल्या दाव्यांवर शंका उपस्थित होतेय.

आमदार नितीन देशमुखांनी काय दावे केले होते?

आमदार नितीन देशमुख म्हणाले की, माझा रक्तदाब वाढला नव्हता.पण मला हार्ट अॅटक आल्याचा बनाव रचण्यात आला. मला रुग्णालयात नेल्यानंतर २०-२५ जणांनी मला पकडून बळजबरीने इंजेक्शन टोचले. ते इंजेक्शन काय होतं माहिती नाही. माझ्या शरीरावर चुकीच्या पद्धतीने प्रक्रिया करण्याचे षडयंत्र रचले होते असा थरारक अनुभव त्यांनी सांगितला होता.

eknath shinde supporters viral shivsena mla nitin deshmukh photo
तुम्ही 24 तासांच्या आत मुंबईत या, आम्ही 'मविआ'तून..., राऊतांचं शिंदे गटाला आवाहन

पुढे ते म्हणाले की, मी उद्धव ठाकरेंचा शिवसैनिक आहे, मी मंत्र्यांसोबत गेलो होतो पण मी उद्धव ठाकरे आणि बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. आता मी माझ्या घरी जात आहे. मी रात्री १२ वाजता हॉटेलमधून निघालो. रस्त्यावर तीन वाजता उभा होता.पण माझ्यापाठी २०० पोलीस होते. कोणतेही वाहन मला लिफ्ट देत नव्हते. त्यानंतर पोलीस मला रुग्णालयात घेऊन गेले आणि मला हार्ट अॅटक असल्याचा बनाव रचला, असे नितीन देशमुख यांनी सांगितले. उस्मानाबादमधील कैलास पाटील आणि नितीन देशमुख हे दोन माघारी आले आहेत.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com