Dussehra Melava | शिवसेना आणि शिंदे गटाचा संघर्ष पेटणार; शिवसैनिकांनी सुरू केली मोठी तयारी

दसरा मेळावा घेण्यावरुन शिंदे गट आणि शिवसेनेत रस्सीखेच सुरू आहे.
Shivsena Dussehra Melava , Uddhav Thackeray
Shivsena Dussehra Melava , Uddhav Thackeray Saam Tv

मुंबई: शिवसेनेचे (Shivsena) ज्येष्ठनेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंड केले, त्यामुळे शिवसेनेत उभी फूट पडली. आता दसरा मेळावा घेण्यावरुनही शिंदे गट आणि शिवसेनेत रस्सीखेच सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराज मैदानात या वर्षी पहिल्यांदाच दसरा मेळावा घेण्यासाठी कोणालाच परवानगी न देण्याचा निर्णय मुंबई महापालिका घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे. (Shivsena Dussehra Melava)

Shivsena Dussehra Melava , Uddhav Thackeray
Raj Thackeray Speech : मनसे-भाजप युती होणार? राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

आज मुंबई महापालिका शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यासाठी आलेल्या दोन अर्जांवर निर्णय घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. दसरा मेळ्याव्याला शिवसेनेला शिवतीर्थ नाकारलं तर शिवसेना कोर्टात जाणार असल्याचे बोलले जात आहे. महापालिकेने वेळकाढूपणा करून प्रकरण ताणल्यास शिवसेना (Shivsena) थेट मैदानात उतरणार आहे.

Shivsena Dussehra Melava , Uddhav Thackeray
Gram Panchayat Election Result 2022 : ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीला माेठा धक्का; शिंदे गटाची आगेकूच

शिवतीर्थावर नेमका दसरा मेळावा कोणाचा होणार? यावर महापालिका आज निर्णय घेणार आहे. या निर्णयाची वाट शिंदे गट आणि ठाकरे गट पाहत आहेत, मात्र निर्णय घेण्याआधी विधी व न्याय विभागाचा सल्ला मुंबई महापालिका घेत असल्याची माहिती समोर आली आहे.

मात्र यामध्ये शिवसेनेकडून दसरा मेळाव्यासाठी फक्त आणि फक्त शिवतीर्थ हा एकमेव पर्याय आहे. इतर कुठल्याही मैदानावर मेळावा घेण्याचा विचार शिवसेना करणार नाही, असं बोलले जात आहे.

मुंबई महापालिकेने निर्णय घेण्यास उशीर लावून हे प्रकरण आणखीन ताणल्यास शिवसेना आता थेट मैदानात उतरून दसरा मेळावा घेण्याच्या तयारीत आहे. सध्या महापालिकेकडे शिंदे गट आणि ठाकरे गट या दोन्ही गटाचे अर्ज शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्या संदर्भात आले आहेत. पहिला अर्ज शिवसेनेचा आला आहे त्यामुळे शिवसेनेलाच दसरा मेळावा शिवतीर्थावर घेण्याची परवानगी मिळावी, अशी अपेक्षा शिवसेनेला आहे. पण मुंबई महापालिका हे प्रकरण ताणून निर्णय घेण्यास उशीर लावत असेल तर दसऱ्याच्या दिवशी थेट शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्याची तयारी शिवसेनेने (Shivsena) दाखवली आहे. (Shivsena Dussehra Melava)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com