
मुंबई: शिवसेनेचे ज्येष्ठ आणि वजनदार नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे नाराज असल्याची माहिती माहिती मिळत आहे. काल विधान परिषदेच्या मतदानानंतर एकनाथ शिंदे हे विधानभवनातून थेट गुजरातमधील सुरतला गेले असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. पक्षावर नाराज असलेले एकनाथ शिंदे भाजपात (BJP) प्रवेश करणार असल्याचं बोललं जातंय. मोठी बाब म्हणजे एकनाथ शिंदे एकटे गेले नसून त्यांच्यासोबत त्यांचे निकटवर्तीय असलेले तब्बल १७ आमदार आणि पदाधिकारीही सुरतमधील एका हॉटेलात थांबले असल्याची सुत्रांची माहिती आहे. याबाबत सोशल मीडयावरही आता चर्चांना उधाणा आलं आहे. सोशल मीडियावर यूजर्स भरभरुन व्यक्त होतायत. महाराष्ट्राच्या राजकीय स्थितीवर आणि एकनाथ शिंदेंच्या बंडावर संक्षिप्त भाष्य करणारा असाच एक व्हिडिओ (Viral Video) सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ( Viral Video Clip Dharmaveer Movie)
हे देखील पाहा -
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या खळबळ माजली आहे. शिवसेनेतले पावरफुल्ल नेते एकनाथ शिंदेंनीच बंडखोरी केल्याने शिवसेनेची मोठी कोंडी झाली आहे. अशात नेटीझन्सनेही यावर आपलं मत हटके अंदाजात व्यक्त केलं आहे. शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आलेल्या धर्मवीर या चित्रपटातील एक व्हिडिओ क्लिपमधील डायलॉग सध्या व्हायरल होतोय. मात्र ही व्हिडिओ क्लिप एडिटेड करुन शेयर केली जात आहे. यात आनंद दिघे "एकनाथ कुठे आहे?" असं विचारताना दिसत आहे. पुढे लगेच एकनाथ शिंदे यांचे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतचे फोटो जोडण्यात आले आहेत. एकीकडे एकनाथ शिंदेंनी फडणवीसांना मुख्यमंत्री करा असा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे पाठवला आहे. यावरच हा मिश्किल व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय.
शिवसेनेचे संपर्कात नसलेले आमदार
1. एकनाथ शिंदे
2. शंभूराज देसाई
3. अब्दुल सत्तार
4. संदीपान भुमरे
5. भरत गोगावले
6. महेंद्र दळवी
7. संजय शिरसाठ
8. विश्वनाथ भोईर
9. बालाजी केणीकर
10. किमा दाबा पाटील
11. तानाजी सावंत
12. महेश शिंदे
13. थोरवे
14. शहाजी पाटील
15. प्रकाश आबिटकर
16. अनिल बाबर
17. किशोर अप्पा पाटील
18. संजय रायमुलकर
19. संजय गायकवाड
20. शांताराम मोरे
21. लता सोनवणे
22. श्रीनिवास वणगा
23. प्रकाश सुर्वे
24. ज्ञानेश्वर चौगुले
25. प्रताप सरनाईक
26. यामिनी जाधव
Edited By - Akshay Basiane
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.