Thackeray vs Shinde : धनुष्यबाण चिन्हाबाबतचा निर्णय कधी? समोर आली महत्वाची माहिती

30 जानेवारीला ठाकरे आणि शिंदे गट निवडणूक आयोगासमोर लेखी म्हणणं मांडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Maharashtra Political Crisis Eknath Shinde Vs Uddhav Thackeray News
Maharashtra Political Crisis Eknath Shinde Vs Uddhav Thackeray NewsSaam TV

Shivsena Uddhav Thackeray vs Eknath Shinde : शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाला मिळणार याबाबत निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरू आहे. निवडणूक आयोगाने ठाकरे आणि शिंदे गटाला ३० जानेवारीपर्यंत आपलं म्हणणं लेखी स्वरुपात मांडण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, 30 जानेवारीला ठाकरे आणि शिंदे गट लेखी म्हणणं मांडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे धनुष्यबाण चिन्हाबाबत ३० जानेवारीलाच फैसला येण्याची शक्यता आहे. (Maharashtra Political News)

Maharashtra Political Crisis Eknath Shinde Vs Uddhav Thackeray News
Sukhoi 30- Mirage 2000 Aircraft Crashed : हवाई दलाची सुखोई -३०, मिराज २००० लढाऊ विमाने कोसळली, भीषण अपघाताचा VIDEO पाहा

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी जवळपास ४० आमदारांसह शिवसेनेतून बंड केलं. शिंदेंच्या बंडामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकारचं बहुमत कमी झालं. परिणामी सरकार कोसळलं. त्यानंतर शिंदे यांनी थेट भाजपसोबत हातमिळवणी करत राज्यात नवं शिंदे-फडणवीस सरकार स्थापन केलं. (Latest Marathi News)

इतकंच नाही तर, खरी शिवसेना आपलीच असल्याचा दावाही शिंदे यांनी केला. पुढे हा वाद सुप्रीम कोर्टात गेला. काही दिवसांच्या सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण निवडणूक आयोगाकडे सोपावलं आहे. तेव्हापासून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शिंदे गट निवडणूक आयोगासमोर दावे-प्रतिदावे करत आहेत.

ठाकरे-शिंदे गटांकडून वकिलांशी चर्चा

दरम्यान, निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना आपलं म्हणणं ३० जानेवारीपर्यंत मांडण्याचे आदेश दिल्यानंतर ठाकरे आणि शिंदे गटाने आयोगसमोर आपली कागदपत्रे सादर करण्यापूर्वी आपआपल्या वकिलांशी चर्चा केली आहे. दोन्ही गटांनी वकिलांशी दीर्घकाल चर्चा केल्याची माहिती आहे.

Maharashtra Political Crisis Eknath Shinde Vs Uddhav Thackeray News
Ashish Shelar: 'BBC च्या बोगस डॉक्यूमेंट्रीचा शो कराल तर ...' आशिष शेलारांचा टाटा इंस्टिट्यूटला इशारा

सोमवारी सकाळी ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाला मेल पाठवला जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. त्याचबरोबर शिंदे गटाकडूनही तज्ञ वकिलांशी चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सोमवारचा दिवस शिंदे आणि ठाकरे गटासाठी महत्त्वाचा आहे.

३० जानेवारीला काय होणार?

दरम्यान, ३० जानेवारीला धनुष्यबाण चिन्हाबाबत निवडणूक आयोग (Election Commission) काय निर्णय देणार? याकडे दोन्ही गटांचं लक्ष लागून आहे. सोमवारी निवडणूक आयोगात सुनावणी होणार नाही. तरीही चिन्हाच्या निर्णयाबाबत दोन निर्णय येण्याची शक्यता आहे. १) सोमवारी धनुष्यबाण चिन्हाचा निर्णय निवडणूक आयोग जाहीर करण्याची शक्यता आहे. २) सोमवारी लेखी म्हणणं मांडल्यानंतर चिन्हबाबतचा निर्णय राखून ठेवला जाण्याचीही शक्यता आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com